'तू बॉल नाही 'मौत' टाकत होतास', सहकारी खेळाडू कडून मोहम्मद सिराजच कौतुक

मोहम्मद सिराजच्या स्विंग बॉलिंगसमोर न्यूझीलंडचे पहिले 3 विकेट पडल्या
IND vs NZ second test match Mohammed Siraj awesome  bowling
IND vs NZ second test match Mohammed Siraj awesome bowling Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई कसोटीच्या (INDvsNZ) दुसऱ्या दिवशी मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) शानदार 150 धावा केल्या आणि त्यानंतर न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने (Ajaz Patel) 10 विकेट घेत इतिहास रचला. मात्र या दोन खेळाडूंशिवाय भारताच्या आणखी एका खेळाडूने वानखेडेच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले. तो म्हणजे आपल्या वेगवान स्विंग गोलंदाजीने किवी संघाच्या टॉप ऑर्डरला हादरा देणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj). सिराजच्या स्विंग बॉलिंगसमोर न्यूझीलंडचे पहिले 3 विकेट पडल्या . टॉम लॅथम, विल यंग आणि रॉस टेलर यांनाही सिराजचे चेंडू समजले नाहीत आणि ते झटपट क्रीजवरून पॅव्हेलियनमध्ये परतले.(IND vs NZ second test match Mohammed Siraj awesome bowling)

मोहम्मद सिराजच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर सहकारी खेळाडू अक्षर पटेलने त्याची मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अक्षर पटेलने मोहम्मद सिराजला एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली. अक्षर पटेल म्हणाला - 'सिराज मियाँ, तु बॉल फेकत होता की मरण ? यावर सिराज म्हणाला, 'ज्यावेळी मी दुखापतीमुळे संघाबाहेर होतो, तेव्हा मी माझ्या गोलंदाजीवर काम करण्याचा विचार करत होतो.मी आऊट स्विंगवर काम केले. न्यूझीलंडचे गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत होते, तेव्हा ते स्विंग का करत नाहीत, असा प्रश्न मला पडत होता. पण नंतर मला वाटले की मी त्याच जागेवर सतत गोलंदाजी करेन.

कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावणाऱ्या टॉम लॅथमचीही विकेट मोहम्मद सिराजने घेतली. सिराजने उत्तम बाऊन्सर फेकून लॅथमची विकेट घेतली. लॅथमच्या विकेटवर सिराज म्हणाला, 'मी गेल्या मॅचमध्ये पाहिलं की त्याच्याकडे कोणताही बाउन्सर टाकला जात नव्हता. मी विराट भाईशी बोललो आणि त्याला बाऊन्सर टाकण्याची योजना आखली. मी त्याला पहिला बाउन्सर टाकला जो त्याच्यावर गेला. त्यानंतर मी पुन्हा एकदा बाऊन्सर टाकला ज्याचा त्याने विचारही केला नव्हता.'

मोहम्मद सिराजने रॉस टेलरलाही बोल्ड केले. त्याच्या आऊट स्विंगवर टेलर पूर्णपणे हतबल झाला होता. टेलरच्या विकेटवर सिराज म्हणाला, 'टेलरला टाकलेला चेंडू हा कोणत्याही वेगवान गोलंदाजाच्या स्वप्नातला चेंडू असतो. मी टेलरसाठी इन-स्विंग क्षेत्ररक्षण केले पण चेंडू बाहेर स्विंग करायला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com