Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ ODI: रोहितच्या नेतृत्वाखाली वनडे क्रमवारीत टीम इंडिया बनली नंबर 1, क्लीन स्वीपचा मोठा फायदा

Team India: भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन मालिका 3-0 ने जिंकली आहे.

दैनिक गोमन्तक

Team India: भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन मालिका 3-0 ने जिंकली आहे. होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 385 धावा फलकावर लावल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा डाव 41.2 षटकांत केवळ 295 धावांत आटोपला. या विजयासह भारतीय संघाला मोठी लॉटरी लागली आहे.

टीम इंडिया नंबर 1

टीम इंडिया (Team India) आता आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर 1 बनली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु झाली तेव्हा न्यूझीलंड संघ आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता हा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचे 114 रेटिंग गुण झाले आहेत.

दुसरीकडे, न्यूझीलंड 111 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तिथे टीम इंडिया नंबर वन आहे. तर इंग्लंड सध्या 113 गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता. पण आता टीम इंडिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंड संघाचे सध्या 3,400 गुण आहेत. तर इग्लंड 113 रेटिंगसह प्रथम क्रमांकावर होता.

त्याचवेळी, न्यूझीलंड (New Zealand) दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याचे रेटिंगही 113 होते. टीम इंडिया तिसर्‍या क्रमांकावर होती, ज्याचे रेटिंग देखील 113 होते आणि गुणांच्या बाबतीत ते 4,847 होते. मात्र या मालिकेनंतर भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची ही अवस्था आहे

या टॉप 3 संघांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. पण आता ऑस्ट्रेलिया 112 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. म्हणजेच हा संघही मागे नाही. परंतु पाकिस्तानी संघ आता पाचव्या क्रमांकावर झुंजत आहे, ज्याचे रेटिंग 106 आहे, जे खूपच कमी आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ सहाव्या तर बांगलादेश संघ सातव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT