T20 World Cup 2026 final rain rule Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup Final: भारत की न्यूझीलंड? पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण असेल 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'ICC'चा नियम काय सांगतो? वाचा

T20 World Cup 2026 final rain rules: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा 'महामुकाबला' ८ मार्च रोजी होणार आहे.

Sameer Amunekar

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा 'महामुकाबला' ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच धाकधूक आहे जर या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? आयसीसीने (ICC) या परिस्थितीसाठी काही स्पष्ट नियम आखून दिले आहेत.

रिझर्व्ह डे आणि निकालासाठी आवश्यक अटी

आयसीसीने या फायनलसाठी एक 'रिझर्व्ह डे' (९ मार्च) राखून ठेवला आहे. जर ८ मार्चला पावसामुळे खेळ होऊ शकला नाही किंवा अपूर्ण राहिला, तर ९ मार्चला तिथूनच पुढे खेळ सुरू होईल. सामना पूर्ण करण्यासाठी आयसीसीने अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळही दिला आहे. जर पावसाने वारंवार व्यत्यय आणला, तर ओव्हर्स कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, निकालासाठी दोन्ही संघांना किमान १०-१० षटके खेळणे अनिवार्य आहे.

दोन्ही दिवस खेळ शक्य न झाल्यास काय?

जर ८ आणि ९ मार्च या दोन्ही दिवसांत पावसामुळे खेळ होऊ शकला नाही किंवा सामना पूर्ण झाला नाही, तर आयसीसीच्या नियमानुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना 'संयुक्त विजेते' (Joint Winners) घोषित केले जाईल.

क्रिकेटच्या इतिहासात अशी दुर्मिळ स्थिती उद्भवल्यास दोन्ही संघ ट्रॉफी वाटून घेतात. भारतासोबत २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशीच स्थिती उद्भवली होती, तेव्हा श्रीलंका आणि भारत हे संयुक्त विजेते ठरले होते.

भारतासमोर इतिहासाची संधी

भारतीय संघ सध्या डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आजवर एकाही संघाने सलग दोनदा ट्रॉफी जिंकलेली नाही. भारताकडे हा विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ आपली पहिली टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने न्यूझीलंडला कधीही हरवलेले नाही, त्यामुळे या सामन्यात एक ऐतिहासिक चुरस पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT