IND vs NZ:  India win by 73 runs in T20, again clean sweep to New Zealand
IND vs NZ: India win by 73 runs in T20, again clean sweep to New Zealand  Twitter @BCCI
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडियाकडून T20 मालिकेत किवींना पुन्हा एकदा 'क्लीन स्वीप'

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने (Team India) जयपूर आणि रांचीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर कोलकात्यातही (Kolkata) न्यूझीलंडचा जोरदार पराभव केला आहे .शेवटच्या T20 मध्ये भारतीय संघाने 73 धावांनी विजय मिळवला आणि यासह त्यांनी न्यूझीलंडचा T20 मालिकेत क्लीन स्वीप केला आहे (IND v NZ). टीम इंडियाने T20 मालिकेत न्यूझीलंडचा सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीप केला. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर 5-0 असा धुव्वा उडवला होता.कोलकाता T20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 184 धावा केल्या, प्रत्युत्तरात किवी संघाला लक्ष्य गाठता आले नाही आणि ते केवळ 111 धावांवर आटोपले. किवी संघाकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक 51 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने अवघ्या 9 धावांत 3 बळी घेतले. हर्षल पटेलने 2 बळी घेतले. युजवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यर आणि दीपक चहर यांनी 1-1 विकेट घेतली.(IND vs NZ: India win by 73 runs in T20, again clean sweep to New Zealand)

भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 56 धावांची खेळी केली. इशान किशनने 21 चेंडूत 29 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 20 चेंडूत 25 आणि व्यंकटेश अय्यरने 20 धावा केल्या. शेवटी दीपक चहरने 8 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. हर्षल पटेलनेही 18 धावांची खेळी खेळली.

कोलकात्यातही रोहित शर्माने नाणेफेक जिंकली मात्र यावेळी भारतीय कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या 38 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी ओपन शॉट्स खेळले. मात्र, 15 व्या षटकात मिचेल सँटनर येताच टीम इंडिया बॅकफूटवर आली.पहिला इशान किशन 29 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. ऋषभ पंतही अवघ्या 4 धावा करून बाद झाला. रोहित शर्मा क्रीजवर राहिला आणि त्याने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतर काही वेळातच ईश सोधीने रोहितचा सर्वोत्तम झेल घेत टीम इंडियाला चौथा धक्का दिला.

मात्र नंतर लास्ट बॅटिंग ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी उत्तम फलंदाजी केली. श्रेयसने 25 आणि व्यंकटेशने 20 धावा केल्या.तर अखेरीस हर्षल पटेलने 11 चेंडूत 18 धावा आणि दीपक चहरने 8 चेंडूत 21 धावा केल्या. दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला 184 धावा करता आल्या.

तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या डावात फक्त गुप्टिलच चांगली फलंदाजी करू शकला. त्याने 36 चेंडूत 51 धावा केल्या. अक्षर पटेलने किवी संघाचे कंबरडे मोडले. अक्षरने डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांच्या विकेट घेतल्या. टिम सेफर्ट, जेम्स नीशम काहीही करू शकले नाहीत. गप्टिलने 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक निश्चितच केले, पण त्याची खेळी भारतीय संघासमोर लहानच ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT