Daryl Mitchell Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs NZ: श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला, किवी फलंदाजाने लगावला गगनचुंबी षटकार; पाहा व्हिडिओ

IND vs NZ Daryl Mitchell Six: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND vs NZ Daryl Mitchell Six: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धावांचा डोंगर उभारला.

दरम्यान, न्यूझीलंडच्या स्टार फलंदाजाने श्रेयस अय्यरचा मोठा विक्रम मोडला. आजच्या सामन्यापूर्वी जगातील सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरच्या नावावर होता. अय्यरने 106 मीटरमध्ये षटकार मारला होता.

आता किवी फलंदाजाने हा विक्रम मोडला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू डॅरिल मिशेलने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला आहे.

दरम्यान, डॅरिल मिचेलने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेंडूवर इतका लांब षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियमच्या वरच्या भागाला लागला. चेंडू वरच्या मजल्यावर आदळला आणि खाली पडला. हा षटकार पाहून क्रिकेट फॅनही अवाक झाले.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा षटकार 107 मीटरचा होता. या षटकारासह जगातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम डॅरिल मिशेलच्या नावावर झाला आहे.

दुसरीकडे, श्रेयस आता कोणत्याही विश्वचषक सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. श्रेयसने सौरव गांगुली आणि युवराज सिंगला मागे सोडले, ज्यांनी प्रत्येकी 7 षटकार ठोकले होते. एवढेच नाही तर सेमीफायनलमध्ये भारतासाठी (India) सर्वात मोठी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत श्रेयस दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

श्रेयस अय्यरने सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने 2003 मध्ये केनियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 111 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आज (15 नोव्हेंबर) हा विक्रम केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT