Christchurch Test Prasidh Krishna Replaces Akash Deep: क्राइस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावरुन ही माहिती देत आकाश दीपला 'कन्कशन' झाल्याचे स्पष्ट केले असून, तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
भारतीय डावाच्या 53व्या षटकात आकाश दीपला दुखापत झाली. काइल जेमिसनच्या दोन उसळत्या चेंडूंचा फटका त्याच्या हेल्मेटला बसला. पहिला चेंडू हेल्मेटच्या ग्रिलवर आदळला, तर अवघ्या चार चेंडूंनंतर आलेला दुसरा चेंडू थेट हेल्मेटच्या वरच्या भागावर लागला. दोन्ही वेळी फिजिओने मैदानावर येऊन त्याची तपासणी केली आणि दुसऱ्या धक्क्यानंतर त्याचे नुकसान झालेले हेल्मेट बदलावे लागले.
या कसोटीच्या पहिल्या डावात आकाश दीपने उपयुक्त योगदान दिले. त्याने 52 चेंडूंमध्ये 29 धावांची खेळी खेळली आणि ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी 46 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
आयसीसीच्या 'कन्कशन सब्स्टीट्यूट' नियमानुसार, एखाद्या खेळाडूला डोक्याला मार लागून कन्कशन झाल्यास, संघाला त्याच्या जागी तितक्याच क्षमतेचा आणि त्याच भूमिकेतील बदली खेळाडू घेण्याची मुभा मिळते. याच नियमाचा आधार घेत भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आकाश दीपऐवजी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संधी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.