Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ 3rd T20 Match: टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्यांदाच T20 मालिका जिंकून केला हा पराक्रम

IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना नेपियर येथे खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना नेपियर येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला, यासह टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने जिंकून इतिहास रचला. या मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ खेळत होता. या दौऱ्यात विराट कोहली-रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

उभय संघांमधील हा सामना पावसामुळे उशिरा सुरु झाला आणि नाणेफेकही उशिराने झाली. 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने 4 विकेट गमावत 75 धावा केल्या होत्या. दीपक हुड्डा 9 आणि हार्दिक पांड्या 30 धावा करुन खेळत होते. भारताला विजयासाठी 66 चेंडूत 86 धावा हव्या होत्या, पण त्यापलीकडे हा सामना खेळता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.

न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच असा पराक्रम केला

ही मालिका जिंकून टीम इंडियाने मोठा विक्रम केला आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच सलग दुसरी टी-20 मालिका जिंकली आहे. याआधी टीम इंडियाने (Team India) 2020-21 च्या दौऱ्यावरही टी-20 मालिका जिंकली होती. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळले गेले आणि पाचही सामने टीम इंडियाच्या नावावर होते.

अर्शदीप-सिराजची शानदार गोलंदाजी

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रत्येकी चार विकेट्समुळे भारताने (India) तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात न्यूझीलंडला 19.4 षटकात 160 धावांत गुंडाळले. यजमानांनी शेवटच्या 30 धावांत आठ विकेट गमावल्या. 16 व्या षटकात न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद 130 अशी होती, पण अर्शदीप (37 धावांत 4 बळी) आणि सिराज (17 धावांत 4 बळी) यांनी शानदार पुनरागमन करत न्यूझीलंड संघाला दोन चेंडू शिल्लक असतानाच गुंडाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT