IND vs NZ 3rd ODI Match
IND vs NZ 3rd ODI Match Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: फिकीर नाय! मालिका गमावूनही न्यूझीलंड तणावमुक्त, NZ च्या स्टार फलंदाजाचं मोठं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

IND vs NZ 3rd ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 जानेवारी रोजी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ अनेक वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळत आहे, त्यामुळे संघाला याचा फटका सहन करावा लागत आहे.

भारताविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान न्यूझीलंडला केन विल्यमसन आणि इतर वरिष्ठ खेळाडूंची उणीव भासत असेल, परंतु अष्टपैलू डॅरिल मिचेलच्या म्हणण्यानुसार, यामुळे संघाला नवीन संयोजन करुन पाहण्याची आणि वेगळे संतुलन साधण्याची संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडमध्ये वरिष्ठ खेळाडूंचा अभाव आहे

विल्यमसनशिवाय या मालिकेत न्यूझीलंड (New Zealand) संघात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी नाहीत. तर प्रशिक्षक गॅरी स्टेड देखील संघासोबत नाहीत. तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याच्या पत्रकार परिषदेत मिचेल म्हणाला की, "मला वाटते की, काही खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव देण्यासोबतच संघाला काही नवीन कॉम्बिनेशन करुन पाहण्याची आणि वेगळे संतुलन निर्माण करण्याची केनची अनुपस्थिती ही चांगली संधी आहे."

फलंदाज सतत फ्लॉप होत आहेत

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड 0-2 ने पिछाडीवर आहे. तर टॉप ऑर्डर धावा काढण्यासाठी धडपडत आहे. हैदराबादमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांची धावसंख्या सहा बाद 131 अशी होती, त्यानंतर सातव्या क्रमांकाचा फलंदाज मायकल ब्रेसवेलने संघाला लक्ष्याच्या जवळ नेले.

मात्र, रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ब्रेसवेलला कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 108 धावांत गारद झाला.

शेवटच्या वनडेसाठी संघ उत्सुक

या कामगिरीबाबत संघ फारसा विचार करत नसल्याचे डॅरिल मिचेलने सांगितले. तो म्हणाला की, ''प्रत्येकाला माहित आहे की, क्रिकेटमध्ये असे घडते, जसे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात घडले. हे खेळाचे स्वरुप आहे. आपण नाणेफेक गमावली आणि त्यानंतर कठीण खेळपट्टीवर संघ लवकर बाद झाला. एक संघ म्हणून, आम्ही याबद्दल जास्त विचार करत नाही आणि म्हणूनच उद्याच्या सामन्याबद्दल खूप उत्सुक आहोत.''

दुसरीकडे, एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात (India) होणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडला भारतीय संघाविरुद्ध किमान एक विजय नोंदवायचा आहे. मिशेल पुढे म्हणाला की, 'आमच्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणे आणि खेळपट्टीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT