India vs New Zealand: रविवारी हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत यजमान भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे तब्बल 48 वर्षांनी वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंगले.
विशेष म्हणजे न्यूझीलंड भारतासाठी वर्ल्डकप विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसत आहे. केवळ हॉकीमध्येच नाही, तर क्रिकेटमध्येही भारताच्या विश्वविजेतेपद मिळवण्याच्या स्वप्नावर न्यूझीलंडच पाणी टाकले आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षात चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे जगज्जेतेपदाचे स्वप्न तुटले आहे.
रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या क्रॉसओव्हर सामन्यात निर्धारित वेळेनंतर 3-3 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले. पेनल्टी शुटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताला 5-4 अशी मात दिली.
यापूर्वी 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारताला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. त्यामुळे भारताचे तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंगले होते. त्या सामन्यात भारताला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर 2021 मध्ये 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडनेच 8 विकेट्सने पराभूत केले होते आणि पहिल्यांदा कसोटी विश्वविजेतेपद जिंकण्याचा मान मिळवला होता.
साल 2021 मध्येच आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर टी20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताचा साखळी फेरीत न्यूझीलंडशी सामना झाला होता. या सामन्यातही भारताला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताच्या बाद फेरीत पोहचण्याच्या आशेला सुरुंग लागला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.