Asia Cup Hockey Team India  Twitter
क्रीडा

Asia Cup Hockey:टीम इंडियाची शानदार कामगिरी, रोमहर्षक सामन्यात जपानचा 2-1 असा पराभव

Asia Cup Hockeyमध्ये टीम इंडियाने जपानचा 2-1 असा पराभव केला.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022 India Won Against Japan: भारतीय हॉकी संघाने आशिया चषक 2022 सुपर-4 मधील त्यांचा पहिल्या सामन्यात जपानवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने जपानचा 2-1 असा पराभव केला. याआधी ग्रुप मॅचमध्ये जपानने टीम इंडियाचा 2-5 असा पराभव केला होता. या विजयासह भारताने जपानवरच्या अपयशाचे यशात रूपांतर केले. टीम इंडियाच्या मनजीत आणि पवनने प्रत्येकी एक गोल केला. त्याचवेळी जपानसाठी ताकुमा निवाने एकमेव गोल केला. (Asia Cup Hockey)

या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. या सामन्याचा पहिला क्वार्टर भारताच्या नावावर होता. भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी मनजीतने पहिला गोल केला. तर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत पोहोचले होते. जपानने गोलशून्य बरोबरी साधली होती.

तिसऱ्या क्वार्टरदरम्यान टीम इंडियाने आक्रमक खेळ करत आणखी एक गोल केला. 40व्या मिनिटाला भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. या क्वार्टरमध्ये भारत आणि जपानच्या खेळाडूंमध्ये संघर्ष सुरूच होता. मात्र क्वार्टरअखेर जपानला बरोबरी साधता आली नाही. भारताची आघाडी अबाधित राहिली. चौथ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने जपानला गोल करू दिला नाही. अशा प्रकारे भारताने शानदार विजय आपल्या खिशात घातला.

याआधी आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने इंडोनेशियाला 16-0 ने मागे पाडले होते. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला सामना अनिर्णित राहिला. भारतीय हॉकी संघाने यावेळी आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू मनिंदरला दुखापत झाली होती. यामुळे त्याला बाहेर जावे लागले. मनिंदर 50 व्या मिनिटाला जपानी खेळाडूकडून चेंडू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान चेंडू हॉकीला लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर आदळला. मनिंदरच्या ओठावर दुखापत झाल्याने त्याला बाहेर जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT