IPL 2022 मध्ये जोस बटलरचे चौथे शतक; विराट कोहलीच्या रेकॉर्डला धोका

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने आणखी एक धमाकेदार शतक झळकावले.
RR vs RCB Latest Updates
RR vs RCB Latest UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने आणखी एक धमाकेदार शतक झळकावले. यासह संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघाने आणखी एक सामना जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

राजस्थान रॉयल्सचा संघ आता त्यांच्या दुसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. त्यासाठी आयपीएलच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा बलाढ्य क्रीडा संघ दाखवावा लागणार आहे. कारण अंतिम फेरीत तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स या नंबर वन संघाशी भिडणार आहे.

RR vs RCB Latest Updates
साऊथच्या चित्रपटांनी मला वाईट हिंदी चित्रपटांपासून वाचवले: सोनू सूद

विशेष बाब म्हणजे गुजरात टायटन्सने पहिल्या क्वालिफायरमध्ये आरआरचा पराभव केला, त्यामुळेच आज राजस्थानला दुसरा क्वालिफायर खेळावा लागला. दुसऱ्या सामन्यात राजस्थानने कोणतीही चूक न करता जवळपास एकतर्फी झालेल्या सामन्यात आरसीबीचा सात गडी राखून पराभव केला.

दरम्यान, IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा जोस बटलरने आणखी एक नाबाद शतक झळकावले आहे. आयपीएल 2022 मधील त्याचे हे चौथे शतक आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी तो मैदानात आला आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. संघाला विजय मिळवून देऊनच तो बाहेर पडला. आजच्या सामन्यात जोस बटलरने 60 चेंडूत 106 धावा केल्या. त्याने सहा षटकार आणि दहा चौकार मारले.

त्याचा स्ट्राईक रेट 176 पेक्षा जास्त होता. जोस बटलरने या वर्षात आतापर्यंत 16 सामन्यात 818 धावा केल्या आहेत. आता तो आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याच्या जवळ आला आहे. IPL 2016 च्या एकाच मोसमात विराट कोहलीने चार शतके झळकावली होती. या सामन्यात शतक झळकावत जोस बटलरने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

पुढच्या सामन्यात म्हणजे अंतिम सामन्यात त्याने आणखी एक शतक झळकावले तर तो विराट कोहलीचा पाच वर्षे जुना विक्रम मोडेल. 2016 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com