Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: रोहित शर्मा फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत

भारतीय संघाला मालिका 2-0 ने जिंकायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल करू शकतो

दैनिक गोमन्तक

IND vs ENG: भारतीय संघाने पहिला T20 सामना अतिशय तुफानी पद्धतीने जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. दुसरा टी-20 सामना जिंकून भारतीय संघाला मालिका 2-0 ने जिंकायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल करू शकतो. तो अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे.

ही सलामीची जोडी असू शकते

रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीच्या जोडीचे मैदानात उतरणे निश्चित झाल्याचे दिसते आहे. इशान किशनने मागच्या सामन्यात नावाप्रमाणे कामगिरी केली नसेल, पण तो एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. त्याचवेळी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित झाले आहे.

या खेळाडूंना संधी मिळू शकते

मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. त्याचवेळी हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकासाठी जागा मिळू शकते. हार्दिकने पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी खेळ दाखवला तर हार्दिककडे अशी कला आहे की तो अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचं रंग रूप बदलू शकतो. त्याचबरोबर ऋषभ पंत यष्टीरक्षकाची जबाबदारी निभावताना दिसणार आहे.

रोहितचा या गोलंदाजांवर विश्वास

इंग्लंडच्या खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. या खेळपट्ट्यांवर कहर करण्यासाठी भारताकडे भुवनेश्वर कुमार, हर्षल आणि जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर युझवेंद्र चहल फिरकीची जबाबदारी निभावताना दिसणार आहे. रवींद्र जडेजाला अष्टपैलू म्हणून स्थान मिळू शकते. भुवनेश्वर कुमारकडे टी-20 क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, जो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.

पहिल्या T20I साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि रवींद्र जडेजा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; पंतप्रधान मोदी आणि CM सावंतांचा 'व्हिडिओ कॉल' व्हायरल

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

Viral Video: दिवाळी सेलमध्ये 'रणकंदन', साडीसाठी दोन महिला एकमेकींवर तुटून पडल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT