गांगुलीने रचला भारतीय संघाचा पाया, म्हणून 'दादा'ची गणना यशस्वी कर्णधारांमध्ये

सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो.
Sourav Ganguly MS Dhoni
Sourav Ganguly MS DhoniDinik Gomantak
Published on
Updated on

Sourav Ganguly Birthday: भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचे आजोबा म्हणून ओळखले जाणारे सौरव गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी झाला. 'प्रिन्स ऑफ कोलकाता' म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. खरे तर सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. भारत मॅच फिक्सिंगमधून जात असताना त्याने भारतीय संघाची कमान हाती घेतली होती, पण सौरव गांगुलीने युवा खेळाडूंसह एक उत्तम संघ बनवला.

Sourav Ganguly MS Dhoni
IND vs WI 2022: 'मला जमेत धरु नका' विराट कोहलीची निवड समीतीकडे विनंती!

गांगुलीने रचला भारतीय संघाचा पाया

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2003 च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी भारतीय क्रिकेटला नवी दिशा मिळाली होती. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ या युवा खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आणि याच काळात त्यांना आपल्या खेळाची छाप पाडली होती. असे म्हटले जाते की सौरवने आपल्या कर्णधारपदाखाली मजबूत भारतीय संघाचा पाया रचला होता, ज्याचा आगामी काळात भारतीय क्रिकेटला फायदा झाला.

Sourav Ganguly MS Dhoni
FIH Women's World Cup: भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून आउट

वनडेत दादाच्या नावावर 11 हजारांहून अधिक धावा

दुसरीकडे, जर आपण सौरव गांगुलीच्या कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्याने 113 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 311 एकदिवसीय (ODI) आणि IPL मध्ये 59 सामने खेळले आहेत. दादांनी 113 कसोटी सामन्यात 7212 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 शतके झळकावली, तर 1 द्विशतकही गांगुलीच्या नावावर आहे. याशिवाय माजी कर्णधाराने 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. दादाची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 183 आहे. सौरव गांगुलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 22 शतकांव्यतिरिक्त 72 वेळा पन्नासचा टप्पा ओलांडला. सौरव गांगुलीने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) नेतृत्व केले, याशिवाय तो सहारा पुणे वॉरियर्सकडूनही खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com