Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी, रवींद्र जडेजाचे पुनरागमन अवघड! विराट कोहलबाबतही सस्पेन्स

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु असून या मालिकेपूर्वीच टीम इंडिया आपल्या अनेक स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्रस्त आहे.

Manish Jadhav

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु असून या मालिकेपूर्वीच टीम इंडिया आपल्या अनेक स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्रस्त आहे. मोहम्मद शमी विश्वचषकापासून संघाबाहेर आहे. तर हैदराबाद कसोटीत खेळणारा रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जडेजा विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर पडला असून एनसीएमध्ये त्याचे रिहॅब सुरु आहे. आता राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही त्याला पुनरागमन करणे कठीण असल्याचे त्याच्यासंदर्भातील एका अहवालात म्हटले आहे.

यास 4 ते 8 आठवडे लागतात!

क्रिकबझच्या ताज्या अहवालानुसार, रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याला आणखी वेळ लागू शकतो. सहसा, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी 4 ते 8 आठवडे लागतात. म्हणजेच असे झाल्यास जडेजा राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. यानंतर 23 फेब्रुवारीपासून रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीपर्यंत जडेजा फिट होईल अशी शक्यता आहे. सध्या बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमध्ये फक्त रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय, विराट कोहलीबाबत अद्याप कोणतेही अपडेट मिळालेले नाही.

विराट कोहलीबाबतही सस्पेन्स

दुसरीकडे, विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. त्याचवेळी, विराट तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल की नाही याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. दरम्यान, विराटच्या आईची तब्येत बरी नाही आणि त्यामुळेच तो खेळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्याचा भाऊ विकास कोहलीने या अफवा असल्याचे म्हटले. क्रिकबझने रिपोर्टमध्ये सांगितले की, विराट सध्या देशाबाहेर आहे.

टीम इंडिया अडचणीत

एकूणच टीम इंडिया सध्या अडचणीत आहे. केएल राहुलही विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर आहे. अशा स्थितीत शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघ आपल्या युवा खेळाडूंच्या बळावर टक्कर देणार आहे. संघाची जबाबदारी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएस भरत या युवा खेळाडूंवर असेल. मात्र, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांचा अनुभव संघाला उपयोगी पडू शकतो. मात्र हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर विझागमध्ये पुनरागमन करण्यासाठी संघाला जास्त मेहनत करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Flight Cancelled: हिंडन ते गोवा विमानसेवा रद्द; ऐनवेळी प्रवाशांचे नियोजन बिघडले, एअर इंडिया एक्सप्रेसवर संताप

Calangute Drowning: मित्र नको म्हणाले तरी समुद्रात गेला, मोठी लाट आली आणि घात झाला; मणिपूरचा युवक कळंगुट किनाऱ्यावर बुडाला

Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

Goa Assembly Live: 'एसटी' कर्मचार्‍य‍ांना ६ महिन्य‍ांत बढत्या!

Old Goa construction: जुने गोवेतला ‘तो’ बंगला पाडा! विरोधक आक्रमक; सभापतींसमोर घेतली धाव, कामकाज स्‍थगित

SCROLL FOR NEXT