Ben Stokes  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: अश्विनच्या 'ट्रॅप' मध्ये अडकला बेन स्टोक्स; डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत नकोसा रेकॉर्ड केला नावावर

India vs England 1st Test: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने पहिल्या डावात तीन बळी घेतल्यानंतर शनिवारी दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी केली.

Manish Jadhav

India vs England 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबादच्या मैदानावर खेळवली जात आहे. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने पहिल्या डावात तीन बळी घेतल्यानंतर शनिवारी दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी केली. इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली (31) शिवाय त्याने कर्णधार बेन स्टोक्सला (10) आपल्या जाळ्यात अडकले. स्टोक्सने 24 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारला. 37व्या षटकात गोलंदाजी झाल्यावर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टोक्स बाद होताच त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.

दरम्यान, स्टोक्स हा अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केलेला फलंदाज ठरला आहे. अश्विन आतापर्यंत 12 वेळा स्टोक्सचा बळी ठरला आहे. स्टोक्सने नुकतेच कसोटीतून निवृत्त झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे, ज्याला अश्विनने 11 वेळा बाद केले होते. वॉर्नरनंतर या यादीत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ॲलिस्टर कुकचा समावेश आहे. अश्विन हा भारतीय फिरकी गोलंदाज आहे, ज्याने कसोटीत सर्वाधिक वेळा एकाच फलंदाजाला बाद केले आहे. त्याच्यानंतर या यादीत माजी फिरकीपटू हरभजन सिंग आहे, ज्याने रिकी पाँटिंगला 10 वेळा बाद केले.

कसोटीत अश्विनने सर्वाधिक वेळा या दिग्गजांना बाद केले

12 - बेन स्टोक्स

11 - डेव्हिड वॉर्नर

9 - ॲलिस्टर कुक

8 - टॉम लॅथम/स्टीव्ह स्मिथ/क्रेग ब्रॅथवेट

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडच्या 246 धावांना प्रत्युत्तर देताना यजमान भारताने पहिल्या डावात 436 धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 190 धावांची भक्कम आघाडी मिळाली. यशस्वी जयस्वालने 80 आणि केएल राहुलने 86 धावांचे योगदान दिले. रवींद्र जडेजाने 87 धावा केल्या. त्याचवेळी, इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार सुरुवात केली. क्रॉली आणि बेन डकेट (47) यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या 163 धावांवर पाच विकेट पडल्या. टीम ब्रेकपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 172/5 होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT