David Malan Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी मोठा बदल, या तगड्या खेळाडूचा संघात प्रवेश!

दैनिक गोमन्तक

India vs England T20 World Cup 2022: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2022 चा सेमीफायनल सामना 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी संघाच्या स्क्वॉड मोठा बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेदरम्यान नुकताच एक खेळाडू जखमी झाला होता, त्यामुळे संघात हा मोठा बदल करण्यात आला आहे.

T20 विश्वचषकादरम्यान या खेळाडूची एंट्री

T20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 च्या या मोठ्या सामन्यापूर्वी इंग्लंड (England) संघाच्या कॅम्पमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान दुखापतग्रस्त झाला होता. डेली मेलच्या वृत्तानुसार, स्फोटक सलामीवीर फिल सॉल्टला स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मलानच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान डेव्हिड मलानला दुखापत झाली होती.

स्फोटक फलंदाजी

फिल सॉल्टला (Phil Salt) नंबर-3 वर खेळण्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत इंग्लिश संघासाठी 11 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये फिल सॉल्टने 164.3 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा केल्या आहेत. फिल सॉल्टने या काळात दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.

सहकारी खेळाडूने एक मोठी अपडेट दिली

डेव्हिड मलानच्या दुखापतीवर त्याचा सहकारी मोईन अलीने मोठी अपडेट दिली आहे. बीबीसीशी बोलताना मोईन अली (Moeen Ali) म्हणाला की, 'तो अनेक वर्षांपासून आमच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहीला आहे. काल तो स्कॅनसाठी गेला होता, मात्र जेव्हा तो माघारी आला तेव्हा ठिक दिसत नव्हता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT