India vs England 2nd Semi-Final, ICC Men's T20 World Cup 2026 Dainik Gomantak
क्रीडा

India vs England: इंग्रजांचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाचं फायनलचं तिकीट कन्फर्म; आता किवींसोबत होणार महामुकाबला!

India vs England, 2nd Semi-Final: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.

Sameer Amunekar

India vs England 2nd Semi-Final, ICC Men's T20 World Cup 2026

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने कडवी झुंज दिली, मात्र विजयाचे लक्ष्य त्यांना गाठता आले नाही. या विजयासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला, मात्र त्यानंतर संजू सॅमसनने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.

सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८९ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला इशान किशन (३९ धावा) आणि शिवम दुबे (४३ धावा) यांनी मोलाची साथ दिली. अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद २५३ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले होते.

इंग्लंडची झुंजार खेळी

२५४ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची रणनीती स्पष्ट होती. जॅकब बेथेलने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवला. बेथेलच्या फटकेबाजीमुळे भारतीय गोटात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

इंग्लंडने २० षटकांत ७ गडी गमावून २४६ धावांपर्यंत मजल मारली, परंतु मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी संयम राखल्यामुळे इंग्लंडला ७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी गाठ

आता अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष अंतिम सामन्याकडे लागले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो, तर भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही.

दोन्ही संघ

इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, बेन डकेट, ल्यूक वूड, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन.

टीम इंडिया : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT