Kuldeep Yadav | IND vs BAN, 1st Test  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 1st Test: कमबॅक करताच कुलदीप यादवने रचला नवा विक्रम, कुंबळे-अश्विनला पछाडलं

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत ५ विकेट्स घेत कुलदीप यादवने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Pranali Kodre

Kuldeep Yadav 5 wickets haul: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यातून भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने जवळपास दोन वर्षांनी कसोटीत पुनरागमन केले. विशेष म्हणजे त्याने पुनरागनाच्या सामन्यातच शानदार कामगिरीही केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कुलदीप भारतीय संघातून आत-बाहेर करत होता. पण अखेर त्याला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवरच रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्याने या डावात 16 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याने 6 षटके निर्धाव देखील टाकली. त्यामुळे तो बांगलादेशविरुद्ध कसोटीत सर्वोत्तम प्रदर्शन करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत आर अश्विनच्या विक्रमाला मागे टाकले. यापूर्वी हा विक्रम अश्विनच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये फातुल्लाह येथे झालेल्या कसोटीत 87 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुनील जोशी आहेत. त्यांनी 2000 साली 142 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ 55 धावांतील 4 विकेट्ससह अनिल कुंबळे आहे. त्याचबरोबर कुलदीप हा अश्विन आणि सुनील यांच्यानंतर बांगलादेशविरुद्ध कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेणारा तिसराच फिरकीपटूही आहे.

याबरोबरच बांगलादेश विरुद्ध कसोटीत एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा कुलदीप हा एकूण सातवा भारतीय गोलंदाज आहे.

त्याच्यापूर्वी झहीर खानने 3 वेळा, इरफान पठाणने 2 वेळा बांगलादेशविरुद्ध कसोटीत एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सुनील, अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक वेळा असा कारनामा केलाय.

कुलदीपचे फलंदाजीतही योगदान

चितगावमध्ये सुरु असलेल्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून कुलदीपनेही 40 धावांचे योगदान दिले. त्याने ही खेळी करताना 114 चेंडूचा सामना केला आणि अश्विनबरोबर 92 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा पार करण्यात मदत झाली.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावा केल्या, तर श्रेयस अय्यर 86 आणि अश्विनने 58 धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT