Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs Aus T20 Series: T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, SKY कर्णधार तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार

IND vs Aus T20 Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Manish Jadhav

IND vs Aus T20 Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला या मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

रिंकू सिंहला मिळाली संधी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताच्या अनेक विस्फोटक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत आयपीएलदरम्यान खळबळ माजवणारा स्टार खेळाडू रिंकू सिंहचा संघात समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय, स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मालाही संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकादरम्यान (World Cup) वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीची बरीच चर्चा झाली होती, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Goa Murder Case: पीर्ण येथील हत्येचं गूढ 15 तासांत उलगडलं, मुख्य आरोपीला अटक; साथीदारांचा शोध सुरू

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

SCROLL FOR NEXT