Ind vs Nz T20 Series
Ind vs Nz T20 SeriesDainik Gomantak

Ind vs Nz T20 Series: पांड्याच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून T20 मालिका, प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल!

उभय देशांतील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता खेळवला जाणार आहे.
Published on

T20 विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून T20 मालिका सुरू होत आहे. वेलिंग्टन येथे उभय संघात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दण्यात आले आहे. उभय देशांतील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Ind vs Nz T20 Series
Mapusa Incident: विहिरीत उडी घेतलेल्या 65 वर्षीय महिलेला जीवनदान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात ऋषभ पंत आणि शुभमन गिल डावाची सुरूवात करू शकतात. भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला सलामीला संधी देऊ शकतात. चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकात चमकदार कामगिरी केलेला शुभमन गिल वेलिंग्टनमध्ये टी-20 पदार्पण करण्याची शक्यता आहे.

Ind vs Nz T20 Series
Mopa Airport Inauguration : मोपा विमानतळाच्या लोकार्पणासाठी 11 डिसेंबरची तारीख निश्चित, पण...

तसेच, इशान किशनला मागील काही दिवस टॉप ऑर्डरमध्ये संधी देण्यात आली होती. या मालिकेत देखील त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली जाऊ शकते. याशिवाय संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली असून, मालिकेत तो चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. वॉशिंग्टन सुंदरचेही संघात पुनरागमन होणार असून त्याच्याकडूनही फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

न्यूझीलंड मालिकेत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना एकत्र गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. तसेच, उमरान मलिक देखील उत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com