Ravichandran ashwin  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 'हे' पाच रेकॉर्ड्स, अश्विन अन् उस्मान ख्वाजा चमकले

IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने (Australia) 90 षटकांत 4 गडी गमावून 255 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 77 षटकांत 6 गडी गमावून 225 धावा केल्या. यादरम्यान उस्मान ख्वाजाचे (180) द्विशतक हुकले. तर कॅमेरुन ग्रीनने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

तसेच, दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अश्विनने नॅथन लायनला बाद करत मालिकेत दुसऱ्यांदा पाच बळी मिळवले. येथे आम्ही तुम्हाला चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केलेल्या पाच मोठ्या विक्रमांबद्दल सांगणार आहोत.

उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांच्यात द्विशतकी भागीदारी

स्टार अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन आणि सलामीवीर उस्मान ख्वाजा या जोडीने भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कसोटी भागीदारी करण्याचा विक्रम केला.

तब्बल 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या एका जोडीने हा पराक्रम करुन दाखवला आहे. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 358 चेंडूत 208 धावांची भागीदारी झाली.

याआधी ऑस्ट्रेलियन जोडीने सर्वोच्च भागीदारीचा विक्रम अॅलन बॉर्डर आणि किम ह्युजेस यांच्या नावावर होता.

कॅमेरुन ग्रीनचे शतक

बोटाच्या शस्त्रक्रियेमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेल्या कॅमेरुन ग्रीनने 170 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 114 धावा केल्या.

यादरम्यान, भारतामध्ये पहिले कसोटी शतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी लेस फेवेल, पॉल शीहान, डीन जोन्स, मायकेल क्लार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी हा पराक्रम केला आहे.

ख्वाजाने स्मिथला मागे सोडले

उस्मान ख्वाजाने स्टीव्ह स्मिथला मागे टाकून भारतातील (India) एका डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या बनवली आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 422 चेंडूंचा सामना करत 180 धावा केल्या.

भारतातील ऑस्ट्रेलियन फलंदाजाची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. मॅथ्यू (203) दुसऱ्या आणि जोन्स (210) पहिल्या स्थानावर आहेत. स्मिथच्या नावावर 178 धावा आहेत.

शमीने त्याचाच विक्रम मोडला

बॉर्डर गावस्कर मालिकेत वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी बराच वेळ थांबावे लागले आहे. पण चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जरा जास्तच संघर्ष करावा लागला.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शमीने 31 षटकात 134 धावा देत दोन विकेट घेतल्या. ऑगस्ट 2014 नंतर शमीने इतकी षटके टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटच्या वेळी त्याने कसोटी सामन्यात 28 षटके टाकली होती.

अश्विनने नॅथन लायनची बरोबरी केली

भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अश्विनला कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, टॉड मर्फी, नॅथन, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्कच्या रुपाने 6 विकेट मिळाल्या. या 6 विकेट्ससह अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे, तर त्याने या यादीत नॅथन लायनची बरोबरी केली आहे. दोन्ही गोलंदाजांच्या नावावर आता 113-113 विकेट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT