Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: 35 धावा करताच कोहली रचणार इतिहास; 'या' दिग्गजांच्या क्लबमध्ये होणार सामील!

Manish Jadhav

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (11 जानेवारी) होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच T20 फॉरमॅटमधील द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टी-20 सामने खेळले गेले आहेत. आगामी T20 विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची दोन्ही संघांना चांगली संधी आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने भारतीय खेळपट्ट्यांवर 14192 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे, कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 नंतर टी-20 संघात परतले आहेत. या मालिकेदरम्यान विराट कोहलीने आणखी 35 धावा केल्या तर तो घरच्या मैदानावर 12,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल. घरच्या मैदानावर 12,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट हा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सचिननंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे नाव येते. ज्याने ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर 13117 धावा केल्या आहेत.

यानंतर, या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचे नाव येते, ज्याने दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर 12305 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे, ज्याने केवळ श्रीलंकेत 12043 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. विराट कोहली सध्या या यादीत पाचव्या स्थानावर असून टॉप-5 मध्ये तो एकमेव सध्याचा क्रिकेटपटू आहे, तर उर्वरित चार खेळाडूंनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीने 35 धावा केल्या तर घरच्या मैदानावर 12000 धावांचा आकडा गाठणारा तो पाचवा फलंदाज ठरेल. जर त्याने 84 धावा केल्या तर तो या यादीत कुमार संगकाराला मागे टाकेल.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकाही याच महिन्यापासून सुरु होणार आहे. विराट कोहली ज्या प्रकारचा फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतच हे दोन्ही रेकॉर्ड करेल. विराट अजूनही कॅलिसपेक्षा 345 धावांनी मागे आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. विराटचा फिटनेस पाहता भविष्यात तो या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही मागे सोडू शकतो असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT