FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या सेरिटनला`शतका`ची संधी

बचावपटू 2024 पर्यंत संघात; आतापर्यंत 95 आयएसएल सामने

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने अनुभवी बचावपटू सेरिटन फर्नांडिस याच्या करारात वाढ केली आहे. 29 वर्षीय बचावपटू 2024 पर्यंत संघात कायम राहील. त्यामुळे त्याला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्याला शतकी सामने खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ( Increase in the contract of Ceriton Fernandes )

एफसी गोवाने 2017 साली केपे येथील सेरिटनला करारबद्ध केले होते. तेव्हापासून तो एफसी गोवातर्फे राईट बॅक जागी पाच मोसमात 95 आयएसएल सामने खेळला आहे. करार 2024 पर्यंत वाढविल्यामुळे सेरिटनला आता एफसी गोवास सात मोसम खेळण्याची संधी आहे. एफसी गोवा संघातील मुक्काम वाढविताना खूप आनंद होत आहे. असे करारपत्रात सही केल्यानंतर सेरिटनने नमूद केले.

पाच मोसमातील प्रवास

``एफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत मी पाच वर्षांपूर्व पदार्पण केले, तेव्हापासून माझी फुटबॉलपटू या नात्याने खूप वाढ झाली आहे. माझ्या विकासात एफसी गोवाचा फार मोठा वाटा आहे. प्रेमभावना आणि समर्पित भावनेने त्याची परतफेड करताना मला आनंद होईल, से सेरिटन म्हणाला. 2017-18 ते 2021-22 या कालावधीत सेरिटन एफसी गोवातर्फे 95 सामन्यांत 8247 मिनिटे खेळला आहे.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सेरिटनच्या करारात वाढ केल्यानंतर समाधान व्यक्त केले.``मागील पाच मोसमात सेरिटन एफसी गोवासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला आहे. तो देशातील एक सर्वोत्तम राईट बॅक खेळाडू असून एफसी गोवाच्या ड्रेसिंग रुममधील वरिष्ठ सदस्यही आहे,` असे पुस्कूर यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात सेरिटन फर्नांडिसची कारकीर्द

- 2017 मध्ये आयएसएल ड्राफ्टमधून एफसी गोवाची सेरिटनला पसंती

- 2017-18 मोसमात 20 पैकी 19 आयएसएल मोसमात प्रतिनिधित्व

- 2018-19 मोसमातील आयएसएल उपविजेत्यांतर्फे 21 मिनिटे वगळता सर्व सामने खेळला, सुपर कपचाही मानकरी

- 2019-20 मोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड संघाचा सदस्य

- 2020-21 मोसमात एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत पदार्पण, सर्व ६ सामने खेळला

- 2021 मधील सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड, ड्युरँड कप विजेत्या एफसी गोवाचा खेळाडू

- आयएसएलसह सर्व स्पर्धांत मिळून एफसी गोवातर्फे 108 सामने

- आयएसएलमधील 95 सामन्यांत पासिंगमध्ये 78.81 टक्के परिणामकारक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT