हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यावेळी झालेल्या कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य तर मुलांनी केली कास्य पदकाची कमाई केली. तसेच मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे. (maharashtra girls kabaddi team won silver medal in khelo india games )
सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आज कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदकाची कमाई केली. सुवर्णपदकासाठी हरियाणाशी झालेली लढत त्यांना जिंकता नाही. महाराष्ट्राच्या संघाचा हरियाणाकडून 19 गुणांनी पराभव झाला. याशिवाय, मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे.
पंचकुला येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांदरम्या कबड्डीचा अंतिम सामना झाला. हरियाणाची खेळाडू पूजा हिने केलेल्या चढायांमुळे महाराष्ट्राचा संघ संकटात आला. एक दोन अपवाद वगळता महाराष्ट्राच्या मुलींना अंतिम सामन्यात फार प्रभाव दाखवता आला नाही.
सामन्यातील पहिल्या चढाईतील पहिला बोनस पॉईंट हरियाणाच्या नावे नोंदवला गेला. त्यानंतर महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला होता. पहिल्या टाईम आउटच्यावेळी दोन्ही संघाचा गुणतक्ता बरोबरीत होता. त्यानंतर मात्र, हरियाणाच्या पूजाने जबरदस्त खेळ करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.