In the women's cricket team of Goa, priority is given to experienced players Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या महिला क्रिकेट संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य, शिखाकडे नेतृत्व कायम

अष्टपैलू सुनंदा येत्रेकरची उपकर्णधारपदी निवड

दैनिक गोमन्तक

पणजी : आगामी सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.दरम्यान या कसोटीच्या अष्टपैलू शिखा पांडे हिच्याकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.तसेच स्पर्धेतील मोहिमेस 18 एप्रिलपासून मोहाली येथे सुरवात होईल.

या क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA) गुरुवारी संघ जाहीर केला असुन हा संघ शुक्रवारी (ता. 15) रवाना होईल.गोव्याचा एलिट ड गटात समावेश असून गुजरात, उत्तराखंड, विदर्भ, उत्तर प्रदेश, बडोदा या संघांविरुद्ध सामने होतील. त्यापैकी दोन लढती प्रकाशझोतात खेळल्या जातील.

दरम्यान पाहिल गेलं तर गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये महिलांचा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाली होती. या महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट (Cricket) स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी शिखा स्थान मिळवू शकली नव्हती.दरम्यान या होणाऱ्या टी-20 स्पर्धेद्वारे तिला राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी लाभेल.तसेच अष्टपैलू सुनंदा येत्रेकर हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

संघात या दोन नव्या चेहऱ्यांची निवड

स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात कृपा पटेल व खुशी बांदेकर या दोघींची निवड झाली आहे.महत्वाचं म्हणजे या सीनियर संघात त्यांची पहिल्यांदाच निवड झाली आणि बाकी खेळाडू मग गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय संघात होत्या.

गोव्याची तयारी जोरदार

गोव्याला सीनियर टी-20 स्पर्धेनिमित्त तयारीची चांगली संधी लाभली आहे. व्हिज्युअल लिंक क्रिकेटर्सने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने नुकतीच 10 संघांची महिला टी-20 स्पर्धा घेतली होती.दरम्यान प्रत्येक संघास साखळी फेरीत किमान चार सामने खेळायला मिळाले असून जीसीएने टी-20 संभाव्य संघासाठी सहा सराव सामने घेतले, त्यापैकी दोन लढती प्रकाश झोतात झाल्या.

एकदिवसीय स्पर्धेत बाद फेरी

गोव्याने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती.दरम्यान या साखळी फेरीत त्यांनी चार सामने जिंकले व फक्त एकच लढत त्यांनी गमावली.उपउपांत्यपूर्व लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यानंतर गोव्याला पंजाबकडून हार पत्करावी लागली आणि आता टी-20 स्पर्धेत प्रतिस्पर्धी असलेल्या गुजरात व विदर्भाला गोव्याने एकदिवसीय स्पर्धेत नमविले होते.

गोव्याचा महिला क्रिकेट संघ

शिखा पांडे (कर्णधार), सुनंदा येत्रेकर (उपकर्णधार), निकिता मळीक, तनया नाईक, सावली कोळंबकर, रुपाली चव्हाण, सेजल सातार्डेकर, खुशी बांदेकर, श्रेया परब, इब्तिसाम शेख, पूर्वजा वेर्लेकर, पूर्वा भाईडकर, दिव्या नाईक, तेजस्विनी दुर्गड, संजुला नाईक, विनवी गुरव (यष्टिरक्षक), सयानी राऊत देसाई, मिताली गौंडर, मंजुश्री भगत, कृपा पटेल यांचा गोव्याच्या महिला क्रिकेट संघात समावेश आहे.

असे आहे गोव्याच्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक

18 एप्रिल : गोवा विरुद्ध गुजरात

19 एप्रिल : गोवा विरुद्ध उत्तराखंड

21 एप्रिल : गोवा विरुद्ध विदर्भ

22 एप्रिल : गोवा विरुद्ध उत्तर प्रदेश

24 एप्रिल : गोवा विरुद्ध बडोदा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT