Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

जडेजाचा जलवाच न्यारा; एका सामन्यात अश्विन-होल्डरला मागे टाकत पोहचला टॉपवर

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कसोटीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकले आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत रवींद्र जडेजा कसोटीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) मागे टाकले आहे. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जडेजाने (Ravindra Jadeja) चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने नाबाद 175 धावांची खेळी उभारली. यानंतर त्याने नऊ विकेट्सही घेतल्या. आणि विशेष म्हणजे त्याचाच फायदा जडजेला क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी झाला आहे. अश्विननेही या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मात्र जडेजाला मिळालेल्या फायद्यामुळे अश्विन दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या जडेजाचे 406 गुण आहेत. तर होल्डरचे 382 आणि अश्विनचे ​​347 गुण आहेत. बांगलादेशचा शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) चौथ्या तर इंग्लंडचा (England) बेन स्टोक्स पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे मात्र ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला याचा मोठा फटका बसला असून त्याची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

कोहली, पंतला फायदा

फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी स्थान मिळवले आहे. कोहली पाचव्या स्थानावर पोहोचला असून पंतनेही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. तो 10 व्या स्थानावर आहे. तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 936 गुणांसह पहिल्या तर इंग्लंडचा धाकड फलंदाज जो रुट 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीमध्ये अश्विन आणि बुमराह अव्वल 10 मध्ये कायम

गोलंदाजीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह अव्वल 10 मध्ये कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 892 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अश्विनचे ​​850 गुण असून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर कायम आहे. मोहाली कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जडेजाला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजाने प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT