अश्विन म्हणाला, पुढचा कपिल देव बनण्यासाठी मी...

श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यादरम्यान आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) पूर्व भारतीय कर्णधार कपिल देव यांचा कसोटीतील विक्रम मोडला आहे.
Ravichandran Ashwin
Ravichandran AshwinDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यादरम्यान आर. अश्विनने पूर्व भारतीय कर्णधार कपिल देव यांचा कसोटीतील विक्रम मोडला आहे. त्यामुळे आता आर. अश्विन (Ravichandran Ashwin) भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, जिथे कपिल देव (Kapil Dev) पहिल्या क्रमांकावर होते. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट घेतल्या, मात्र आता आर. अश्विनने हा आकडा पार केला आहे.

दरम्यान, कपिल देव यांचा विक्रम मोडणाऱ्या आर अश्विनने म्हटले की, 'लहानपणी मला फलंदाज बनायचे होते. आणि पुढचा कपिल देव बनण्यासाठी मी मध्यम गतीने गोलंदाजीही करत असे.' 35 वर्षीय आर अश्विनने त्याच्या 85 व्या कसोटीत कपिल देव यांच्या 434 कसोटी बळींचा टप्पा पार केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यानंतर तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. 28 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला तेव्हा मी माझ्या दादा सोबत टाळ्या वाजवत होतो, अशी आठवण देखील यावेळी आश्विनने सांगितली.

Ravichandran Ashwin
माजी कर्णधार ग्रेग चॅपेलने शेन वॉर्नबद्दल केले मोठे वक्तव्य

आश्विन म्हणाला, 'मी त्यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेईन असे स्वप्नातही वाटले नव्हते. कारण मला फलंदाज व्हायचे होते. विशेषतः वयाच्या आठव्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1994 मध्ये फलंदाजी हा माझा छंद होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील एक चमकता तारा होता. तर कपिल देव स्वतः एक विस्फोटक फलंदाज होते.'

Ravichandran Ashwin
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत 'या' ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

अश्विन पुढे म्हणाला, 'माझ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार मी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. जेणेकरुन मी पुढचा कपिल पाजी बनू शकेन. तिथून ऑफस्पिनर बनून इतकी वर्षे भारताकडून खेळण्याचा विचार मी कधीच केला नव्हता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com