भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या कर्णधारपदाची सुरुवात शानदार केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला. विशेष म्हणजे रोहितने 60 धावांची शानदार खेळी केली. रोहितला आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत या कामगिरीचा फायदा झाला आहे, जिथे त्याने टीम इंडियाचा (Team India) पूर्व कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अगदी जवळ आला आहे. (In The ICC ODI Rankings Rohit Sharma Will Soon Overtake Virat Kohli)
दरम्यान, ताज्या क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, दोघांमधील गुणांचा फरक कमी झाला आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावून महत्त्वाचे रेटिंग गुण मिळवले. कोहलीच्या 828 विरुद्ध रोहितचे 807 रेटिंग गुण आहेत.
तसेच, रोहितला आता या मालिकेत विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो अपयशी ठरला आणि त्याला केवळ 5 धावा करता आल्या. परंतु कोहली स्वत:ही सलग दुसऱ्या वनडेत अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात केवळ 8 धावा करणाऱ्या कोहलीला दुसऱ्या सामन्यात 18 धावाच करता आल्या. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही डावांचा मोठा परिणाम क्रमवारीत पाहायला मिळणार आहे.
शिवाय, अव्वल स्थानाचा विचार केला तर पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर फखर जमान आणि इंग्लंडचा फलंदाज जो रुट (Joe Root) पहिल्या दहामध्ये पोहोचले आहेत. मात्र भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आठ धावा करणारा वेस्ट इंडिजचा शेई होप पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे.
गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) सातव्या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आठव्या क्रमांकासह सर्वोत्तम भारतीय आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने चार स्थानांनी सुधारणा करत अव्वल 20 मध्ये पोहोचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.