Fazalhaq Farooqi Dainik Gomantak
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादच्या नव्या अफगाण गोलंदाजाचे बांगलादेशात 'गदर' !

चितगावमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा (Afghanistan) संघ 49.1 षटकात अवघ्या 215 धावांवर गारद झाला.

दैनिक गोमन्तक

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत अफगाणिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. चितगावमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा संघ 49.1 षटकात अवघ्या 215 धावांवर गारद झाला. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या (Afghanistan) फझलहक फारुकीने (Fazalhaq Farooqi) शानदार गोलंदाजी करत पुढील संघाला पूर्णपणे आपल्या प्रभावक्षेत्रामध्ये ठेवले. (In The First ODI Against Bangladesh Fazal Farooqi Took 4 Wickets Off 11 Balls)

दरम्यान, फारुकीने बांगलादेशची (Bangladesh) टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त केली. फझलहक फारुकीने बांगलादेशचे दिग्गज फलंदाज तमीम इक्बाल, लिटन दास, मुशफिकुर रहीम यांना आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर यासिर अलीही फारुकीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तसेच, फारुकीने अवघ्या 11 चेंडूंमध्ये बांगलादेशच्या चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याच्या चेंडूंवर सलग तीन चौकार मारले. त्यात तमिम इक्बालने दोन चौकार मारले. आपला दुसरा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या फारुकीने प्रथम लिटन दासला गुरबाजकडे झेलबाद केले. यानंतर त्याने बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर त्याने मुशफिकुर रहीमलाही असेच आऊट केले. फारुकीने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात 2-2 बळी घेतले.

शिवाय, फारुकी आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये देखील खेळताना दिसणार आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 50 लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समावेश केला आहे. फारुकी अवघ्या 21 वर्षांचा आहे. अफगाणिस्तानमध्ये त्याला प्रतिभावान गोलंदाज म्हणून गणले जाते. ज्याची झलक फारुकीने चितगाव वनडेतही दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT