IPL 2022  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: 'या' दोन संघांची लीगधून उडाली दांडी ! प्लेऑफमध्ये पोहोचणे बनले अशक्य

आयपीएल 2022 (IPL 2022) चा 15 वा हंगाम अतिशय धमाकेदार स्टाईलमध्ये खेळवला जात आहे.

दैनिक गोमन्तक

IPL 2022: आयपीएल 2022 चा 15 वा हंगाम अतिशय धमाकेदार स्टाईलमध्ये खेळवला जात आहे. विशेष म्हणजे यंदा नवीन संघ सुरुवातीपासूनच आपला जलवा दाखवत आहेत. विशेषत: गुजरातचा संघ आयपीएल 2022 (IPL 2022) चा किताब जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि CSK यांची अवस्था मात्र वाईट झाली आहे. आता या दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे. (In IPL 2022 Mumbai Indians Chennai Super Kings are now almost impossible to reach the playoffs)

CSK ची बुडती नय्या

IPL 2022 मध्ये CSK ची सुरुवात सुमारचं झाली आहे. 4 वेळचा चॅम्पियन संघ आता IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. सीझन सुरु होण्यापूर्वीच कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) CSK चे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर हा संघ सतत अडचणींचा सामना करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली नवा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सीएसकेला 6 पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवून दिला आहे. सीएसके लीग टेबलमध्ये तळापासून दुसऱ्या स्थानावर आहे. आणि आता या वर्षी ते प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या जवळपास पोहोचले आहेत.

मुंबईची वाईट अवस्था

IPL 2022 मध्ये CSK पेक्षा अधिक वाईट स्थिती जर कोणत्या संघाची असेल तो संघ मुंबई इंडियन्स आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सध्या त्यांचे सर्व 6 सामने गमावल्यानंतर लीग टेबलमध्ये तळाशी आहे. आपल्या संघाला पाचवेळा ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मालाही गुणतालिकेत संघाचे खाते कसे उघडायचे हे समजत नाही. मुंबईने आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तरी हा संघ यंदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही.

दोन्ही संघ चॅम्पियन

मुंबई आणि CSK बद्दल बोलायचे झाले तर, या संघांना IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानले जातात. आयपीएलच्या 14 हंगामात या दोन संघांनी 9 वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु यंदाची गोष्ट अगदी उलट आहे. आयपीएलच्या दोन सर्वात यशस्वी संघांकडे सध्या सर्वात कमकुवत संघ म्हणून पाहिले जातं आहे. रविवारीही सीएसकेला गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबईला गेल्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT