IPL 2022: शिखर धवनकडे पंजाबचे कर्णधारपद, का होता मयंक अग्रवाल संघाबाहेर?

SRH vs PBKS: शिखर धवनकडे पंजाब किंग्जचे कर्णधारपद देण्यात आले आहे. मयंक अग्रवालच्या दुखापतीमुळे धवनने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संघाची धुरा सांभाळली.
Mayank Agarwal
Mayank AgarwalDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे पंजाब किंग्जचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मयंक अग्रवालच्या दुखापतीमुळे, धवनने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल-2022 सामन्यात पंजाब संघाची जबाबदारी स्वीकारली. मयंक अग्रवाल का आणि किती काळ संघाबाहेर असेल हेही धवनने नाणेफेकीनंतर सांगितले. (Punjab Kings captaincy to Shikhar Dhawan in IPL 2022)

Mayank Agarwal
राष्ट्रीय बुद्धिबळात गोव्याच्या एथनची छाप

याआधी धवनने 2014 च्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाची कमान सांभाळली होती आणि त्यानंतर पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघ त्याच्यासमोर होता. आता अगदी उलट आहे. चालू हंगामात तो पंजाबचे प्रतिनिधित्व करत आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाब संघात एकच बदल झाला असून मयंक अग्रवाल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी प्रभसिमरन सिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याचबरोबर हैदराबाद संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

शिखर धवननेही याचे कारण सांगितले. नाणेफेक (IPL 2022) हरल्यानंतर तो म्हणाला, 'मयंकच्या पायाला दुखापत झाली आहे. पुढच्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. आमच्या संघात एकच बदल आहे - प्रभसिमरनला संधी देण्यात आली आहे.

Mayank Agarwal
KL राहुलने झंझावाती शतक केल्यावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून न राहता आम्ही मोसमात चांगली कामगिरी करत आहोत. संघ म्हणून चांगले खेळत राहण्याची गरज आहे.

तो पुढे म्हणाला, 'गोलंदाजी चांगली होऊ शकते, आम्ही त्यावर काम करत आहोत. संघ नवीन आहे आणि आम्ही सेटल होण्यासाठी वेळ घेत आहोत. जर आम्ही या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या केली तर आम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकतो.'' शिखर धवनने या टी-20 लीगमध्ये 5981 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com