Sports Events in 2023 Dainik Gomantak
क्रीडा

New Year 2023: यंदा हॉकी, क्रिकेट, फुटबॉल वर्ल्डकपची मेजवाणी; वाचा महत्त्वाच्या स्पर्धांचं वेळापत्रक

साल 2023 मध्ये अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

Pranali Kodre

Sports Events in 2023: साल 2022 संपले असून आता 2023 वर्षाचे जगभरातून स्वागत झाले आहे. गेल्यावर्षात क्रीडा जगतात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. वर्षाची अखेर फिफा वर्ल्डकपसारख्या स्पर्धेने झाली. आता या नव्या वर्षातही अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. काही वर्ल्डकपही होणार आहेत.

हॉकी वर्ल्डकप 2023 - 13 ते 29 जानेवारी

भारतात 13 ते 29 जानेवारी दरम्यान हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा होणार आहे. हा वर्ल्डकर ओडिसामध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.

आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप 2023 - 14 ते 29 जानेवारी

आयसीसी पहिल्यांदाच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप यावर्षी आयोजित करणार आहे. ही स्पर्धा 14 ते 29 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेला पोहचला आहे.

आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप - 10 ते 26 फेब्रुवारी

यावर्षी 10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयसीसी वरिष्ठ महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. हा वर्ल्डकपही दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आणि स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-2023 - जून 2023

इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर दुसऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात रंगणार आहे. 2021मध्ये झालेल्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 - ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023

भारतात यावर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. भारतात तब्बल 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकप होणार आहे.

फिफा महिला वर्ल्डकप 2023 - 20 जुलै ते 20 ऑगस्ट

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे यावर्षी 20 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान फिफा महिला फुटबॉल वर्ल्डकर खेळवला जाणार आहे. हे महिला फुटबॉल वर्ल्डकपचे 9 वे पर्व असणार आहे.

एशियन गेम्स - 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर

यावर्षी एशियन गेम्सही होणार आहेत. चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन (16 ते 19 जानेवारी), फ्रेंच ओपन (28 मे ते 11 जून), विम्बल्डन (३ ते 13 जुलै), अमेरिका ओपन (28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर) या टेनिसच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा, बॅडमिंटनमधील ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप (14 ते 19 मार्च), जागतिक चॅम्पियनशिप (21 ते 27 ऑगस्ट), वर्ल्ड टूर फायनल्स (13 ते 17 डिसेंबर) होणार आहेत.

त्याचबरोबर ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा बुंदापेस्टमध्ये 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT