Year 2022: 'या' 5 खेळाडूंनी निवृत्ती घेऊन चाहत्यांची केली निराशा, यामध्ये 3 भारतीय

These Players Take Retirement In Year 2022: 2022 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. 2022 मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली.
Kieron Pollard
Kieron PollardDainik Gomantak
Published on
Updated on

These Players Take Retirement In Year 2022: 2022 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. 2022 मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली. या खेळाडूंनी वर्षानुवर्षे आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. पण 2022 मध्ये हे खेळाडू मैदानापासून दूर गेले. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...

दरम्यान, वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) 20 एप्रिल 2022 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने वेस्ट इंडिज संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. त्याने 123 वनडे आणि 101 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच, इयॉन मॉर्गनने इंग्लंडला 2019 चा एकदिवसीय विश्व किताब मिळवून दिला होता. त्याने 28 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे, इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा तो पहिला कर्णधार ठरला.

Kieron Pollard
Kieron Pollard: धडाकेबाज बॅट्समन किएरॉन पोलार्डची IPL मधून निवृत्ती

दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने 2022 मध्येच निवृत्तीची घोषणा केली होती. तिने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. 12 कसोटी सामन्यात तिने एकूण 44 बळी घेतले. 204 एकदिवसीय सामन्यात 255 बळी घेतले. त्याचबरोबर, 68 टी-20 सामन्यात 56 बळी घेतले. 2007 T20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने 14 सप्टेंबर 2022 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी (India) 46 एकदिवसीय आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत.

Kieron Pollard
Team India: ऋषभ पंत अन् जस्सीचा कसोटी क्रिकेटमध्ये जलवा, BCCI ने केली मोठी घोषणा!

तसेच, भारतीय महिला संघाची कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मिताली राजने 8 जून 2022 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या 40 व्या वर्षी तिने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. तिने भारतासाठी 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com