Imam-ul-Haq Dainik Gomantak
क्रीडा

Imam Ul Haq: पाकिस्तान संघाचा सलामीवीर इमाम उल हकचे दुसऱ्यांदा प्रायव्हेट चॅट लीक; लग्नाआधी...

Imam Ul Haq Private Chats Leak: पाकिस्तान संघाचा स्टार सलामीवीर इमाम उल हक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

Manish Jadhav

Imam Ul Haq Private Chats Leak: पाकिस्तान संघाचा स्टार सलामीवीर इमाम उल हक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. उल हकचे पुन्हा एकदा प्रायव्हेट चॅट सोशल मीडियावर लीक झाले आहे. या चॅटमध्ये तो एका महिलेशी बोलताना दिसत आहे.

हे संपूर्ण प्रकरण त्याच्या लग्नाआधीच उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. इमामचा विवाह 25 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याआधी या डावखुऱ्या फलंदाजाच्या चॅट लीक प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, 27 वर्षीय इमाम-उल-हकचा विवाह सोहळा शनिवारी होणार असून त्याच्या एका दिवसानंतर त्याचे रिसेप्शन होणार आहे. भारतात (India) नुकत्याच पार पडलेल्या ICC ODI विश्वचषक 2023 मध्ये तो पाकिस्तान संघाचा भाग होता, जिथे संघ लीग टप्प्यातच बाहेर पडला.

इमामला 6 डावात संधी मिळाली, पण तो एका अर्धशतकासह केवळ 162 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे.

दुसरीकडे, इमामसोबत असे घडण्याची ही दुसरी घटना आहे. 2019 मध्ये एका महिलेने त्याच्यावर एकाच वेळी तिच्यासह इतर अनेक महिलांसोबत (Women) अफेअर असल्याचा आरोप केला होता. तिने इमामसोबतचे व्हॉट्सअॅप चॅटही सोशल मीडियावर लीक केले होते.

त्यानंतर महिलेने दावा केला होता की, इमाम उल हकसोबतच्या घटना 6 महिन्यांच्या कालावधीत घडल्या होत्या, ज्यामध्ये इंग्लंडमध्ये 2019 च्या विश्वचषकाचाही समावेश होता.

यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघाचे चेअरमन झाका अश्रफ यांनीही बाबर आझमचे चॅट टीव्हीवर लीक केले होते. यावरुन बराच गदारोळ झाला होता, कारण तो संघाचा कर्णधार होता. मात्र, तो आता संघाचा कर्णधार नाही. त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये फक्त फलंदाज म्हणून संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT