Pakistan Cricket: आणखी एक मोठी घोषणा! मुख्य सिलेक्टर्स बनला 'हा' खेळाडू
Pakistan Cricket Announcement: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळाचे वातावरण आहे. एकामागून एक राजीनामे देणाऱ्या दिग्गजांची रांग आहे. सर्वप्रथम मुख्य सिलेक्टर्स इंझमाम उल हक यांचा राजीनामा आला.
त्यानंतर संचालक, मुख्य प्रशिक्षक आणि नंतर कर्णधाराचा राजीनामा आला. आता नेमणुकांचा सिलसिला सुरु झाला असून पाकिस्तान क्रिकेट संघ आणि मंडळातील विविध दिग्गजांना जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.
प्रथम, मोहम्मद हाफीजला डायरेक्टर आणि प्रशिक्षक बनवण्यात आले. आता एका अनुभवी खेळाडूची मुख्य सिलेक्टर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण बनला मुख्य सिलेक्टर्स?
पाकिस्तान क्रिकेटने शुक्रवारी संध्याकाळी आपल्या अधिकृत X हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये वहाब रियाझला पाकिस्तानचा (Pakistan) मुख्य सिलेक्टर्स बनवण्याबाबत माहिती दिली. या व्हिडिओमध्ये स्वत: वहाब रियाझ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानताना दिसत आहे.
त्याने पीसीबी आणि झाका अश्रफ यांचे आभार मानले. आधुनिक काळात ज्या पद्धतीने संघाची गरज आहे, त्याच पद्धतीने संघाला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.
देशांतर्गत क्रिकेटकडे लक्ष द्यावे लागेल
दरम्यान, वहाब रियाझने या व्हिडिओमध्ये आपल्या खेळाडूंसाठी खास संदेश जारी केला आहे. तो म्हणाले की, आम्हाला आमचे देशांतर्गत क्रिकेट पुढे न्यायचे आहे. तिकडे लक्ष केंद्रित करुन तिथल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष द्यायचे आहे.
संघातील संवादाची पातळी सुधारेल असेही तो म्हणाला. तो सर्वांशी बोलतो आणि कोणताही खेळाडू येऊन त्याच्याशी काहीही बोलू शकतो. विशेष म्हणजे, नुकतीच वहाबने पाकिस्तान क्रिकेट संघातून निवृत्ती घेतली होती. 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकातही (World Cup) तो संघाचा महत्त्वाचा भाग होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.