Iftikhar Ahmad | Wahab Riaz Dainik Gomantak
क्रीडा

6 Ball 6 Six Video: 6,6,6,6,6,6... रियाजला 32 वर्षीय फलंदाजानं धुतलं, नंतर गोलंदाजानं स्वत:चीच उडवली खिल्ली

ज्या फलंदाजाने आपल्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारले, त्याच्याच समोर वहाब रियाजने स्वत:चीच खिल्ली उडवली.

Pranali Kodre

6 Ball 6 Six: पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2023 हंगाम 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जालमी या संघात रविवारी एक प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात इफ्तिखार अहमदने वहाब रियाजविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारले. विशेष म्हणजे सामन्यानंतर वहाबने स्वत:चीच खिल्लीही उडवून घेतली.

या सामन्यात सर्फराज अहमद कर्णधार असलेल्या क्वेट्टा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या इफ्तिखारने 20 व्या षटकात वहाब रियाजच्या गोलंदाजीवर सलग 6 षटकार मारले. या षटकादरम्यान वहाबने त्याच्या गोलंदाजीमध्ये बदलही केले होते. पण तो इफ्तिखारला रोखू शकला नाही.

32 वर्षीय इफ्तिखारने ठोकलेल्या या षटकारांमुळे क्वेट्टा ग्लॅडिएटर्सला 20 षटकात 5 बाद 184 धावा करता आल्या. तसेच इफ्तिखार 50 चेंडूत 94 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान सामन्यानंतर वहाब आणि इफ्तिखार यांच्यात गमतीशीर संवादही झाला.

या व्हिडिओमध्ये दिसते की वहाब म्हणाला, 6 षटकार मारणे मोठी गोष्ट असली, तरी 6 षटकार खाण्यासाठीही हिंमत लागते. याशिवाय वहाबने त्याच्या गोलंदाजीवेळी तो काय विचार करत होता, हे देखील सांगितले. सांगण्यासारखी गोष्ट अशी की वहाब पाकिस्तानातील पंजाब राज्याचा प्रभारी क्रीडा मंत्री आहे.

(Iftikhar Ahmad hit 6 sixes in 6 balls against Wahab Riaz)

या सामन्यात 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमच्या नेतृत्वातील पेशावर जालमी संघाला 181 धावाच करता आल्याने त्यांना 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, इफ्तिखार सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो यापूर्वी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळला असून त्याने 10 सामन्यांत 347 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि तीन अर्धशतके केली आहेत.

सध्या पाकिस्तानचे खेळाडू आगामी पाकिस्तान सुपर लीग हंगामासाठी तयारी करत आहेत. हा हंगाम 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिला सामना मुलतान सुलतान्स विरुद्ध लाहोर कलंदर्स संघात पार पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT