CSK | IPL 2022 Latest News Dainik Gomantak
क्रीडा

जडेजा नाही तर हा खेळाडू व्हायला हवा होता CSKचा कर्णधार; रवी शास्त्री

चेन्नई सुपर किंग्जचे पराभव पाहून रवी शास्त्रींनी केले मोठे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

IPL 2022 : या सीझनच्या आयपीएलमध्ये सीएसकेला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. संघ सलग 4 वेळा पराभूत झाला आहे. संघाच्या सलग 4 पराभवांमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सध्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सीएसकेच्या अशा वाईट स्थितीवर विधान केले आहे जे खूप चर्चेत आहे. ते म्हणाले की निश्चितपणे सीएसकेने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवायला नको होते. जडेजासारख्या खेळाडूने आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवे होते. जडेजाला कर्णधारपदी नियुक्त करून CSK ने चुकीचा निर्णय घेतला आहे. (If not Jadeja this player should have been the captain of CSK said Ravi Shastri)

शास्त्री म्हणाले की, 'माझा विश्वास आहे की जडेजासारख्या खेळाडूचे संपूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर असले पाहिजे, त्याने फाफ डू प्लेसिसला संघातून वगळून मोठी चूक केली आहे. सीएसकेने डु प्लेसिसला कर्णधार बनवायला हवे होते. धोनीला (Mahendra Singh Dhoni ) संघाचे कर्णधारपद द्यायचे नसेल, तर फाफकडे जबाबदारी द्यायला हवी होती. जडेजाने केवळ एक खेळाडू म्हणून खेळायला हवे होते; जेणेकरून हा खेळाडू खुल्या मनाने मैदानात उतरू शकेल. कर्णधारपदाच्या दडपणाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

सीएसकेसाठी या हंगामात काहीही चांगले घडत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. संघाला सतत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. सीएसकेला दीपक चहरची उणीव भासत आहे. त्याचबरोबर फलंदाज उत्तम कामगिरी करत नसल्याचे दिसत आहे. ऋतुराजचा सततचा फ्लॉप संघाला कठीण परिस्थितीत टाकत आहे. सध्या रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे हे दोनच फलंदाज आहेत जे सीएसकेसाठी धावा करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT