If Hardik hits 50 I ll resign from my job Fans banner goes viral after GT skipper's fifty, netizens react  Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिक पांड्याने जर 50 रन केले तर मी नोकरी सोडेन, तरुणाचं स्टेडियम मधलं पोस्टर व्हायरल

हार्दिक पांड्याच्या अर्धशतकाची सर्वाधिक चर्चा कारण...

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा 21 वा सामना मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने गुजरातचा पराभव करत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात दोन्ही कर्णधारांनी अर्धशतके झळकावली, मात्र यावेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकाची सर्वाधिक चर्चा आहे. या सामन्यादरम्यान चाहत्याच्या हातात एक अनोखा होर्डिंगही दिसला, त्यानंतर या चाहत्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान 'हार्दिक पांड्याने 50 धावा केल्या तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देईन' असे बॅनर हातात धरलेल्या एका चाहत्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) हैदराबादविरुद्ध कर्णधारपदाची खेळी खेळली. या सामन्यात हार्दिकने 42 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली, आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. हार्दिक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मैदानावर उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हार्दिक पांड्यासमोर आव्हान ठेवले आणि मोठे वचनही दिले. लाइव्ह मॅचमध्ये एका चाहत्याने बॅनर आणला होता, ज्यावर लिहिले होते, 'जर हार्दिकने आज 50 धावा केल्या तर मी नोकरी सोडेन.' आता हार्दिकच्या अर्धशतकानंतर ही व्यक्ती सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चाहते आता सोशल मीडियावर या दर्शकाला ट्रोल करत आहेत आणि नोकरी सोडल्याबद्दल बोलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT