Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Championship: इंग्लंडच्या पाकिस्तानवरील विजयाने मोठे उलटफेर, जाणून घ्या टीम इंडियाची स्थिती

Pranali Kodre

ICC Test Championship: सोमवारी इंग्लंडने यजमान पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना २६ धावांनी जिंकला. याबरोबरच त्यांनी ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली. दरम्यान, इंग्लंडच्या विजयाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर झाले आहेत.

इंग्लंडने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असल्याने आता ते गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकत ४४.४४ च्या विजयी टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आले आहे. मात्र, पाकिस्तानच्या पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला या पराभवांमुळे मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान आता ४२.४२ विजयी टक्केवारीसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

आता पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत विजय आवश्यक झाला आहे. तसेच त्यांना आता अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर

भारताचा संघ या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताची ५२.०८ अशी विजयी टक्केवारी आहे. भारताला अद्याप या स्पर्धेतील दोन मालिका खेळायच्या आहेत.

यातील बांगलादेशविरुद्धची मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होईल. तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकांमध्ये राहण्यासाठी या दोन्ही मालिकेत भारताला विजय आवश्यक आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत ७५ च्या विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच त्यांची पहिल्या दोन क्रमांकामधील जागा आता जवळपास पक्की आहे, कारण अन्य संघांना त्यांना तिथून हलवणे आता बरेच कठीण आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांची विजयी टक्केवारी ६० आहे. पण आता त्यांना आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळायचे आहे. त्यामुळे ही मालिका त्यांच्यासाठी पहिल्या दोन क्रमांकांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची आहे.

ICC Test Championship 2021-2023

दरम्यान, गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, त्यांची ५३.३३ ची विजयी टक्केवारी आहे. आता येत्या काळात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहाण्यासाठी चांगली स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

SCROLL FOR NEXT