India Test Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: विजय भारताचा, पण धक्का द. आफ्रिकेला! दिल्ली कसोटीनंतर WTC Points Table मध्ये मोठे फेरबदल

भारताने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर Test Championship च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत.

Pranali Kodre

ICC World Test Championship 2021-2023: रविवारी (19 फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत 6 विकेट्सने पराभूत केले. यासह 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाची टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याची शक्यताही दाट झाली आहे.

भारताने या सामन्यात विजय मिळवल्याने आता संघाची विजयी टक्केवारी 64.06 अशी झाली आहे. या विजयी टक्केवारीसह भारताने टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेत दुसरा क्रमांक जवळपास पक्का केला आहे. आता भारतला केवळ एका विजयाची गरज आहे. असे झाल्यास भारतीय संघ अंतिम सामन्यातील स्थान पक्के करेल.

दक्षिण आफ्रिकेचे संपले आव्हान

मात्र, भारताच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. कारण दक्षिण आफ्रिका या गुणतालिकेत आता जास्तीत जास्त 56 च्या विजयी टक्केवारीपर्यंत पोहचू शकतात. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तरी भारताची विजयी टक्केवारी 56 च्या खाली येणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या शर्यतीतून बाहेर गेले आहेत.

आता अंतिम सामन्यात पोहचण्याच्या शर्यतीत केवळ ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका हे तीन संघ आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया 66.67 विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे, तर श्रीलंका 53.33 च्या विजयी टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ICC World Test Championship 2021-2023

असे आहे समीकरण

आता जर ऑस्ट्रेलियाला भारताने 4-0 असा व्हाईटवॉश दिला, तरच ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्याच्या शक्यतांना धक्का बसू शकतो. पण तेही जर श्रीलंकेने आगामी कसोटी मालिकेत न्यूझीलंडला 2-0 असे पराभूत केले तरच.

जर न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केले किंवा न्यूझीलंड - श्रीलंका कसोटी मालिकेतील एक सामनाही अनिर्णित राहिला, तरी भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहचतील.

तसेच जर ऑस्ट्रेलियाने भारताला पुढील दोन्ही सामन्यात पराभूत केले आणि श्रीलंकेने न्यूझीलंडला दोन्ही कसोटी सामन्यात पराभूत केले, तरच भारतीय संघ अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो.

दरम्यान, यंदा टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील लंडन येथील द ओव्हल मैदानावर होईल. या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवसही असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT