Yashasvi Jaiswal & R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC पॉइंट्सटेबलमध्ये गमवावे लागले अव्वल स्थान

WTC Points Table: वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत 1-0 अशा विजयानंतर WTC 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत.

Pranali Kodre

ICC World Test Championship 2023 - 2025 points table after West Indies vs India Series :

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना भारताने एका डावानेच जिंकला होता. मात्र दुसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने मालिकेत 1-0 असा विजय मिळवला.

त्रिनिदादला झालेल्या दुसऱ्या कसोटीत अखेरच्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. दरम्यान ही मालिका भारत आणि वेस्ट इंडिज संघाची कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील पहिलीच मालिका होती.

त्यामुळे आता या मालिकेनंतर कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेत फेरबदल झाले आहेत. भारतीय संघ पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर अव्वल क्रमांकावर होते. पण आता दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक विजयी सामन्यासाठी संघाला 12 गुण दिले जातात. तसेच बरोबरी झालेल्या सामन्यासाठी 6, तर अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण मिळतात. तसेच संघांच्या विजयी टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित केली जाते.

या नियमांनुसार आता भारतीय संघाचे 2 सामन्यांनंतर 16 गुण झाले असून विजयी टक्केवारी 66.67 आहे. गुणतालिकेत भारताच्या पुढे पाकिस्तान संघ आहे. पाकिस्तानची सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पाकिस्तान 12 गुणांसह 100 च्या टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात ऍशेस मालिका सुरू आहे. या मालिकेस सध्या 4 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने पुढे आहे. त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 26 गुण आणि 54.17 च्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंड 14 गुणांसह 29.17 च्या टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचे षटकांची गती कमी राखल्याबद्दल प्रत्येकी 2 गुण कापण्यातही आले आहे.

या गुणतालिकेत वेस्ट इंडिज पाचव्या क्रमांकावर असून त्यांचे 4 गुण आणि 16.67 टक्केवारी आहे. तसेच श्रीलंकेने एक पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी पराभव स्विकारल्याने त्यांच्या खात्यात शुन्य गुण आणि शुन्य टक्केवारी आहे. त्यामुळे सध्या ते 9 व्या क्रमांकावर आहेत.

याशिवाय बांगलादेश, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अद्याप तिसऱ्या पर्वात एकही सामना खेळलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT