India women's cricket team dainik gomantak
क्रीडा

ICC महिला विश्वचषक इलेव्हनमध्ये एकही भारतीय महिला नाही

आयसीसीने निवडलेल्या या संघाच्या कर्णधारपदी विश्वचषक विजेती मेग लॅनिंगची निवड

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत 7 वे विजेतेपद पटकावले. यासामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडल्याची घोषणा केली. यानंतर मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. कारण या संघात भारतातील एकाही महिला क्रिकेटरचा यात समावेश झालेला नाही. (ICC Women’s World Cup 2022: No Indian Included In ICC’s Most Valuable Team Of The Tournament)

भारतीय संघ (Indian team) या विश्वचषकात ३ विजय आणि ४ पराभवांसह पाचव्या क्रमांकावर राहिला. या संघात 4 ऑस्ट्रेलियन, 3 दक्षिण आफ्रिकेचे, 2 इंग्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी एक खेळाडू निवडला गेला आहे. या संघाची निवड समालोचक, पत्रकार आणि महिला विश्वचषकात सहभागी असलेल्या ICC पॅनलच्या सदस्यांद्वारे केली जाते.

मेग लॅनिंग कर्णधार बनली

आयसीसीने निवडलेल्या या संघाच्या कर्णधारपदी विश्वचषक विजेती मेग लॅनिंगची (Meg Lanning) निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने एकही सामना न गमावता विश्वचषक जिंकला आहे. सलामीला चमकदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची (South Africa) फलंदाज लॉरा वोलवॉर्टने उपांत्य आणि अंतिम सामन्यातील चॅम्पियन अॅलिसा हिलीची निवड केली आहे. या संघात कर्णधार मेग लॅनिंगला तिसऱ्या क्रमांकावर आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या रॅचेल हेन्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्याच वेळी, नेट सायव्हर, बेथ मुनी आणि हेली मॅथ्यू यांना पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेच्या मारिजन कॅप, शबनीम इस्माईलसह इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन आणि बांगलादेशच्या (Bangladesh) सलमा खातून यांना स्थान मिळाले आहे. बांगलादेशने या स्पर्धेत गोलंदाज म्हणून उत्तम खेळ दाखवला. ज्यामध्ये सलमा खातूनने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचवेळी, सोफी एक्लेस्टनने सर्वाधिक विकेट (21 विकेट) घेतल्या.

आयसीसीने निवडलेला संघ:

लॉरा वोल्वार्ट, अलिसा हिली, मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स, नाट सायव्हर, बेथ मूनी, हेली मॅथ्यू, मारिजने कॅप, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, सलमा खातून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT