Mahli Beardman | Kwena Maphaka X
क्रीडा

U19 World Cup: 'या' खेळाडूची मालिकावीर पुरस्कारावर मोहोर, तर फायनलचा सामनावीर ठरला बिअर्डमन

U19 WC Man Of the Match and Series: 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विजेतेपद जिंकल्यानंतर मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024, Man of the match and Man of The Tournament winner:

रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे युवा संघ आमने-सामने होते. बेनोनीला झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 79 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्यानंतर संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला, तसेच विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि उपविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनाही मेडल देऊन गौरविण्यात आले.

तसेच अंतिम सामन्यानंतर मालिकावीर आणि अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

मालिकावीर पुरस्कार

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी यजमान दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका ठरला. त्याने या स्पर्धेत 6 सामन्यांत 53.3 षटके गोलंदाजी करताना 21 विकेट्स घेतल्या. 

त्याने हा पुरस्कार जिंकण्यासाठी भारताच्या कर्णधार उदय सहारन, सौम्य पांडे, मुशीर खान यांच्यासह उबेद शाह, जेवेल अँड्र्यू, ह्यू वेबगेन आणि स्टीव्ह स्टोल्क या खेळाडूंनाही मागे टाकले.

सामनावीर पुरस्कार

अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या महिल बिअर्डमनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने अंतिम सामन्यात 7 षटके गोलंदाजी करताना 2.10 च्या इकोनॉमी रेटने 15 धावाच देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने भारताच्या मुशीर खान, कर्णधार उदय सहारन आणि आदर्श सिंग या प्रमुख फलंदाजांना बाद केले होते.

भारताचा पराभव

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 43.5 षटकात सर्वबाद 174 धावाच करता आल्या.

या सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. त्याच्यावरच टाकलेली एक नजर

  • विजेता संघ - 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघ

  • उपविजेता संघ - 19 वर्षांखालील भारतीय संघ

  • मालिकावीर - क्वेना मफाका (दक्षिण आफ्रिका), (21 विकेट्स)

  • अंतिम सामन्यातील सामनावीर - महिल बिअर्डमन (ऑस्ट्रेलिया) (3 विकेट्स)

  • सर्वाधिक धावा - उदय सहारन (भारत) (397 धावा)

  • सर्वाधिक विकेट्स - क्वेना मफाका (दक्षिण आफ्रिका), (21 विकेट्स)

  • सर्वोच्च वैयक्तिक धावा - स्नेहिथ रेड्डी (न्यूझीलंड) (नाबाद 147 धावा)

  • सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन - ताझिम अली (इंग्लंड) (29 धावांत 7 विकेट्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT