Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: जो रुट बनला जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज

टीम इंडियाविरुद्ध (Team India) लीड्स कसोटीत (Leeds Test) सर्वोत्तम शतक झळकावत जो रुट जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज बनला आहे.

दैनिक गोमन्तक

भारताविरुद्धच्या (India) कसोटी मालिकेत सातत्याने धावा करणारा इंग्लंडचा (England) कर्णधार जो रुटला (Joe Root) त्याचे बक्षीस मिळाले आहे. टीम इंडियाविरुद्ध (Team India) लीड्स कसोटीत (Leeds Test) सर्वोत्तम शतक झळकावत जो रुट जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज बनला आहे. आयसीसीने (ICC Test Rankings) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जो रुटने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे मात्र टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) खराब कामगिरीमुळे क्रमवारीमधील घसरणीला सामोरे जावे लागले आहे. तसेच तो पहिल्या पाचमधून बाहेर पडला आहे. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ला चांगलाच फायदा झाला आहे, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीत पोहोचला आहे.

2021 मध्ये सतत धावांचा पाऊस पाडणाऱ्या जो रुटने विशेषतःहा भारताला आपले लक्ष्य बनवले आहे. आतापर्यंत टीम इंडियाविरुद्ध 7 कसोटी सामन्यांमध्ये रुटने द्विशतकासह एकूण 4 शतके केली आहेत. यापैकी 3 शतके सध्याच्या मालिकेतील सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये झळकावली आहेत. 500 पेक्षा जास्त धावा करणारा रुट क्रमवारीत एक शिखर पादाक्रांत करत असून आता 916 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी 2015 मध्ये तो नंबर वन फलंदाज बनला होता. विल्यमसन (901) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या क्रमवारीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमकांवर मजल मारली आहे.

रोहितने कोहलीला मागे टाकले

त्याचबरोबर या मालिकेत भारतासाठी सातत्याने चांगली फलंदाजी करणारा सलामीवीर रोहित शर्मालाही त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठली आहे. रोहितने 773 गुणांसह पहिल्यांदाच पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले असून त्याच्या खराब कामगिरीमुळे क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.

बुमराह टॉप -10 मध्ये परतला

गोलंदाजीचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे, तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या मालिकेत सर्वोत्तम गोलंदाजी करणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन आता पाचव्या स्थानावर पोहचला आहे, तर जसप्रीत बुमराह देखील टॉप -10 मध्ये परतला आहे आणि 758 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्याशिवाय मोहम्मद शमी 18 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर इशांत शर्माचे रँकिंग घसरले आहे आणि तो 19 व्या स्थानावर घसरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT