Shaheen Afridi Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Ranking: 'या' पाकिस्तानी गोलंदाजाने टॉप 5 मध्ये पहिल्यांदाच मिळवले स्थान

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच टॉप 5 च्या यादीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसीने नुकतीच टेस्ट रॅंकिंग (ICC Test Ranking) जाहीर केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. परंतु गोलंदाजीच्या आघाडीवर अनेक बदल दिसून आले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच टॉप 5 च्या यादीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय भारताच्या आर.अश्विन (R. Ashwin) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर टीम साऊदी तिसऱ्या तर जोश हेजलवूड चौथ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या अव्वल 5 क्रमवारीत पहिल्यांदाच शाहीन आफ्रिदीचा प्रवेश झाला आहे, ज्याने न्यूझीलंडच्या नील वॅगनरला एका स्थानाने मागे टाकले.

फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही

गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी प्रगती होत असताना फलंदाजीत मात्र कोणताही मोठा बदल झालेला दिसला नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रुट अजूनही 903 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ दोन नंबरवर आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन चौथ्या क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज 5व्या आणि 6व्या स्थानावर असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूणच, टॉप 5 मध्ये एक भारतीय तर टॉप 10 मध्ये 2 भारतीय बॅट्समन आहेत.

श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा फायदा झाला असून तो सातव्या क्रमांकावर कायम आहे. तर पाकिस्तानच्या कर्णधाराच्या भूमिकेत बदल झालेला नाही. भारताच्या श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत शतक झळकावण्याचा फायदा झाला, त्यामुळे तो क्रमवारीत 74 व्या स्थानावर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT