Dainik Gomantak
क्रीडा

Team India Video: WTC फायनलपूर्वी भारतीय खेळाडूंची मस्ती! ICC ने शेअर केला 'बिहाइंड द सीन' व्हिडिओ

India vs Australia: कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मस्ती करत असतानाचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

Pranali Kodre

Team India Behind The Scene Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी द ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंचा जोरदार सराव सुरू आहे. आयसीसी या तयारीदरम्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सामन्यासाठी भारतीय संघाचे ऑफिशियल फोटोशूट पार पडले. या फोटोशूटदरम्यानचा एक गमतीशीर व्हिडिओही आयसीसीने शेअर केला आहे. या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की 'पडद्यामागील घटना (Behind the scenes). कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी केलेली मस्ती पाहा.'

आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की एक एक करून भारतीय खेळाडूंचे फोटोशूट सुरू आहे. यावेळी खेळाडू वेगवेगळ्या पोज देत आहेत. त्याचवेळी खेळाडू एकमेकांबरोबर मस्तीही करत आहेत.

व्हिडिओमध्ये आर अश्विन, रविंद्र जडेजा, रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, ईशान किशन, उमेश यादव, अजिंक्य राहणे असे अनेक खेळाडू दिसत आहेत. त्याचबरोबर गिल आणि ईशान हे एकमेकांबरोबर मस्ती करताना दिसत आहेत.

एकावेळी ईशान बॅटने गिलला मागे मारत असल्याचेही दिसते. त्याचबरोबर चेंडू आणि बॅटवर स्वाक्षरी करतानाही खेळाडू दिसत आहेत. या व्हिडिओला लाखो चाहत्यांनी पसंती दिली असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

भारताला आयसीसी विजेतेपदाची प्रतिक्षा

वरिष्ठ भारतीय पुरुष संघ जवळपास गेल्या 10 वर्षापासून आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतिक्षा करत आहे. भारतीय पुरुष संघाने अखेरीचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद 2013 साली मिळवले होते.

भारतीय संघाने 2013 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात भारतीय संघाने अनेकदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, मात्र विजेतेपद मिळवता आलेले नाही.

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

राखीव खेळाडू - यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT