Shane Watson Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: पाँटिंग, हेडन, वॉटसन, गावसकर यांच्यासह दिग्गज क्रिकेटर करणार वर्ल्ड कपची कॉमेंट्री, पाहा संपूर्ण लिस्ट

ICC ODI World Cup 2023: ICC मेन्स क्रिकेट विश्वचषक 2023 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

Manish Jadhav

ICC ODI World Cup 2023: ICC मेन्स क्रिकेट विश्वचषक 2023 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. सर्व चाहतेही आपल्या आवडत्या खेळाडूला मैदानावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्याचवेळी, काही समालोचकांचे आवाज ICC.tv च्या ICC विश्वचषक 2023 च्या कव्हरेजला चार चॉंद लावतील.

हे खेळाडू 2023 च्या विश्वचषकात आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करतील

ICC.tv च्या कार्यक्रमाच्या कव्हरेजमध्ये प्री-मॅच शो, एक डावाच्या मध्यांतराचा कार्यक्रम आणि सामन्यानंतरचा रॅप-अप समाविष्ट असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन या कव्हरेजमध्ये सामील होतील. त्यांना शेन वॉटसन, लिसा स्थाळेकर, रमीझ राजा, रवी शास्त्री, अॅरॉन फिंच, सुनील गावस्कर आणि मॅथ्यू हेडन यांसारख्या दिग्गजांची साथ मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये नासेर हुसेन, इयान स्मिथ आणि इयान बिशप हे दिसतील, ज्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील 2019 च्या विश्वचषक फायनलला संस्मरणीय बनवले होते.

सायमन डूल, मम्पुमेलो एमबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅन्स, सॅम्युअल बद्री, अथर अली खान आणि रसेल अर्नोल्ड हे दिग्गज खेळाडूही या आनंदात सामील होणार आहेत. पॅनलमध्ये जगातील काही दिग्गज खेळाडू असणार आहेत, ज्यामध्ये हर्षा भोगले, कास नायडू, मार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वार्ड यांच्या नावांचा समावेश आहे.

5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे

विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. याच मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्याने स्पर्धेचा समारोप होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: नितेश राणेंच्या मागणीला केंद्राचा 'ग्रीन' सिग्नल, गणेशोत्सव काळात 'कोकणात' धावणार 16 डब्यांची 'वंदे भारत एक्स्प्रेस'

Rashi Bhavishya 24 August 2025: सन्मान मिळण्याची शक्यता, महत्त्वाचे निर्णय घेण्यास घाई करू नका; आजचा दिवस उत्साही

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

SCROLL FOR NEXT