World Cup 2023: बापरे! भारतात पोहचण्यासाठी इंग्लंडला लागले तब्बल 'एवढे' तास, बेअरस्टोची पोस्ट व्हायरल

England Team: वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतात येताना इंग्लंड संघाला प्रवासादरम्यान मोठा संघर्ष करावा लागला.
England Team
England Team
Published on
Updated on

England team long journey to reached India for ICC ODI World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता आठवड्याहून कमी कालावधी राहिला आहे. यावर्षीचे वनडे वर्ल्डकपचे हे 13 वे पर्व असून भारत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरूवात होण्याआधी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान सर्व सहभागी संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळणार आहेत. त्यामुळे सहभागी संघांनी भारतात हजेरी लावली आहे.

पण, भारतात येणारा इंग्लंडच्या संघाला मोठा संघर्ष करावा लागला असून त्यांना 38 तासांपेक्षाही अधिक काळ प्रवास करावा लागला आहे. याबद्दल यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

England Team
World Cup 2023 साठी भारत 'या' दोन संघाविरुद्ध करणार अंतिम तयारी, पाहा सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
Jonny Bairstow post
Jonny Bairstow postInstagram

बेअरस्टोने त्यांच्या या दीर्घ प्रवासाबद्दल गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये इंग्लंडच्या कर्णधार जॉस बटलरसह अन्य काही खेळाडू विमानात बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतर प्रवासी देखील आहेत.

तसेच त्यात काही खेळाडू काहीस वैतागलेले दिसत आहेत. या पोस्टमध्ये बेअरस्टोने लिहिले आहे की 'निव्वळ गोंधळ'. तसेच त्याने लिहिले की 'लास्ट लेग अजून बाकी...हा अनोखा प्रवास झालाय.' त्याने पुढे हसण्याच्या इमोजीसह लिहिले की 38 तास आणि अजूनही पुढे सुरूच आहे...'.

दरम्यान, इंग्लंडला पहिला सराव सामना भारताविरुद्ध गुवाहाटीमध्ये शनिवारी (30 सप्टेंबर) खेळायचा आहे. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीमध्येच बांगलादेशविरुद्ध इंग्लंडला दुसरा सराव सामना खेळायचा आहे.

England Team
World Cup 2023 स्पर्धेसाठी सर्व 10 संघ फायनल! पाहा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

त्यानंतर वर्ल्डकपच्या मुख्य स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व बटलर करणार असून बेन स्टोक्सही खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेसाठी स्टोक्सने वनडे निवृत्तीतून माघार घेतली आहे.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com