San Williams Dainik Gomantak
क्रीडा

ODI WC Qualifiers 2023: शतकी खेळीसह शॉन विल्यम्सचा भीम पराक्रम, कोहली-बाबरच्या खास क्लबमध्ये सामील

ODI WC Qualifiers 2023: विश्वचषक पात्रता फेरीत गुरुवारी पहिल्या सुपर 6 सामन्यात झिम्बाब्वेने ओमानचा पराभव केला.

Manish Jadhav

ODI WC Qualifiers 2023: विश्वचषक पात्रता फेरीत गुरुवारी पहिल्या सुपर 6 सामन्यात झिम्बाब्वेने ओमानचा पराभव केला.

या सामन्यात झिम्बाब्वेच्या विजयाचा हिरो ठरला तो सीन विल्यम्स, ज्याने 142 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. या खेळीमुळे त्याने अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

शॉन विल्यम्स या खास क्लबमध्ये सामील

झिम्बाब्वेचा धडाकेबाज फलंदाज शॉन विल्यम्स सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी त्याने या स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. यासह, तो एकदिवसीय क्रिकेटमधील पाच डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाच सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे, त्याने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये 596 धावा केल्या आहेत. यानंतर 537 धावा करणाऱ्या बाबर आझमचा क्रमांक लागतो.

आता शॉन विल्यम्सने सलग पाच सामन्यांमध्ये 532 धावा केल्या आहेत. मॅथ्यू हेडनने 529 धावा केल्या आहेत, तर फखर जमानने 515 धावा केल्या आहेत.

सलग 5 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा: पाच सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा

1. विराट कोहली – 596 धावा

2. बाबर आझम - 537 धावा

3. शॉन विल्यम्स - 532 धावा

4. मॅथ्यू हेडन – 529 धावा

5. फखर जमान - 515 धावा

अशी होती विल्यम्सची खेळी

दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करताना विल्यम्स फलंदाजीला आला तेव्हा झिम्बाब्वेने 2 विकेट गमावून 48 धावांपर्यंत मजल मारली. त्याने पहिल्या चेंडूवर आक्रमण केले आणि आपल्या शतकादरम्यान 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

त्याचा स्ट्राइक रेट 123 पेक्षा जास्त होता. त्याने या स्पर्धेत नेपाळ क्रिकेट संघाविरुद्ध शतक (102) ही केले. त्याने नेदरलँड (Netherlands) क्रिकेट संघाविरुद्ध 91 धावांची तूफानी खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT