Pakistan | India vs New Zealand
Pakistan | India vs New Zealand 
क्रीडा

World Cup 2023: पाकिस्तान आऊट! सेमी-फायनलमध्ये भारत - न्यूझीलंड पुन्हा आमने-सामने, पाहा टाईमटेबल

Pranali Kodre

World Cup 2023 Semi-Final Schedule:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरचा सामना रविवारी (12 नोव्हेंबर) होणार आहे. पण त्याआधीच शनिवारी (11 नोव्हेंबर) उपांत्य फेरी खेळणाऱ्या चार संघांवर शिक्कामोर्तब झालं आहे.

खरंतर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. मात्र, चौथ्या क्रमांकासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शर्यत होती. त्यासाठी शनिवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणारा सामना निर्णयाक होता. मात्र, या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच न्यूझीलंडचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे.

स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर 9 सामन्यांतील 5 सामने जिंकून 10 गुणांसह न्यूझीलंड आहे. तसेच पाकिस्तान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी 8 सामन्यांतील 4 सामने जिंकून 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होते. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध फक्त विजय मिळवावा लागणार नव्हता, तर नेट रनरेटमध्येही न्यूझीलंडला मागे टाकावे लागणार होते.

परंतु, इंग्लंडने पाकिस्तानसमोर 338 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पाकिस्तानने जर 6.4 षटकात पूर्ण केले असते, तरच त्यांना न्यूझीलंडला नेट रन रेटमध्ये मागे टाकता येणार होते. मात्र, पाकिस्तानने 7 षटकात 2 बाद 30 धावा केल्या. याबरोबरच पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हानही संपले. त्यामुळे न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

असे रंगणार उपांत्य फेरीचे सामने

दरम्यान, भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहेत. त्यामुळे त्यांचा उपांत्य सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाविरुद्ध होणार आहे.

त्याचमुळे आता चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारताचा उपांत्य सामना रंगणार असल्याचे अधिकृत झाले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

तसेच गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.

उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळानुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीत विजय मिळणारे संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात आमने-सामने असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Goa Todays Live Update: कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

SCROLL FOR NEXT